शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नीरा येथे शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 11:54 IST

खासगी शिकवणीच्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे...

नीरा (पुणे) : नीरा (ता. पुरंदर) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका शिक्षकाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या विरोधात त्याच्याकडेच शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तर, त्या खासगी शिकवणीच्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नीरा (ता. पुरंदर) वाॅर्ड नंबर एकमध्ये ज्ञानदीप कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्याचे काम करणाऱ्या सुनील चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही त्याच्या खासगी शिकवणीत शिकण्यासाठी जात होती. त्याने प्रथम पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. दि.१ मे २०२३ रोजी दुपारी १ वाजल्यानंतर ज्ञानदीप कोचिंग क्लासच्या आतील खोलीमध्ये आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना, तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, आपण लग्न करू असे म्हणून जवळ ओढून घेऊन विनयभंग केला. त्यानंतरही त्याने असे कृत्य तिच्यासोबत वेळोवेळी केले.

त्यानंतर साधारण ८ दिवसांनी क्लास संपल्यावर साधारणता दुपारी १ वाजल्यानंतर आरोपी सुनील चव्हाणने तिला कोचिंग क्लासेसच्या सर्व मुली निघून गेल्यानंतर थांबवून घेतले व तिला शिकवण्याची रूम सोडून दुसऱ्या रूममध्ये नेऊन जवळ घेऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केला. त्यावेळी पीडित मुलीने असे करू नका म्हणून विरोध केला. परंतु त्यांनी तिचे काहीएक न ऐकता तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही त्यांनी तिला नापास करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत इच्छेविरुद्ध जबरजस्तीने शारीरिक संबंध ठेवले. सोमवारी रात्री याबाबतची जेजुरी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. याबाबतचा अधिकचा तपास पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसारे करीत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ