शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष; चंपाषष्ठीनिमित्त लाखो भाविक खंडेरायाच्या चरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 18:25 IST

भंडार खोबर्‍याच्या मुक्त हस्ताने करण्यात आलेल्या उधळणीमुळे संपूर्ण गडकोट आणि प्रमुख रस्ते पिवळ्या जर्द भंडार्‍याने माखल्यामुळे जेजूरीला सोन्याचे रूप

जेजुरी: तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टीचे औचित्य साधून रविवारी आणि आज सुमारे दोन लाखांवर भाविक आले होते. ‘सदांनंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात भंडार खोबर्‍याच्या उधळणीत भाविकांनी रांगा लावून कुलदैवताचे दर्शन घेतले. गडावर आणि शहरात सर्वत्र कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम तसेच देवाचा जयघोष ऐकू येत होता. भंडार खोबर्‍याच्या मुक्त हस्ताने करण्यात आलेल्या उधळणीमुळे संपूर्ण गडकोट आणि प्रमुख रस्ते पिवळ्या जर्द भंडार्‍याने माखल्यामुळे सोन्याच्या जेजूरीचा भास होत होता.

आज सकाळी देवाची महापूजा, महाभिषेकानंतर बालदारीतील घट उठवण्यात आले. त्यानंतर घराघरातील ही घट उठले. देवाला वांगे भरीताचा नैवेद्य दाखवून उत्सवाचा उपवास सोडण्यात आला.  दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीत जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सव साजरा होतो. प्रतिपदेपासून मार्तंड भैरवाने दानवांशी युद्ध सुरू केले ते सहा दिवस चालले. षष्ठीला देवाने दानवांवर विजय मिळवला. ऋषी मुनींनी चाफ्याच्या फुलांनी देवाची पूजा करून विजय दिवस साजरा केला अशी आख्यायीका असून तेव्हापासून हा उत्सव साजरा होत आहे. या सहा दिवसात राज्यातून लाखो भाविक जेजुरी गडावर येवून देवदर्शन घेत असतात. जेजूरीकर ही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. येथील पुजारी सेवक वर्गाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.  त्याच बरोबर सलग सहा दिवस जेजुरी गडावर येणार्‍या भाविकांना देव संस्थान आणि मंडळाकडून दुपारचे मिष्टान्न भोजन ही देण्यात येत होते. सहा दिवसात हजारो भाविकांना अन्नदान करण्यात आले. 

आज सकाळ पासूनच जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी होती. जेजुरी पोलिसांनी वाहतुकीबरोबरच बंदोबस्त चोख ठेवला होता. मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे, अड् विश्वास पानसे, अनिल सौन्दडे, अड् पांडुरंग थोरवे, डॉ.राजेंद्र खेडेकर गडकोटावर जातीने हजर राहून भाविकांच्या सोयी सुविधावर लक्ष ठेवून होते. वयोवृद्धव अपंग भाविकांसाठी गडावर आणणे व खाली पोहोचवण्यासाठी देव संस्थांकडून  चार वाहनांची सोय केली होती. भाविकाकडून देव दर्शनाबरोबरच कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी उरकण्यात येत होते.

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राTempleमंदिरSocialसामाजिक