शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

चिखलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना; पोलिसांकडून तिघांना अटक, कारण आलं समोर...

By नारायण बडगुजर | Updated: May 15, 2024 19:46 IST

गोळीबाराच्या घटनेला कोणतीही राजकीय किनार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले

पिंपरी : मतदानाच्या पूर्वसंध्येला चिखलीत गोळीबाराची घटना घडली. यामुळे खळबळ उडाली. या घटनेला राजकीय किनार आहे का, अशी चर्चा होत असतानाच पोलिसांनी संशयितांना अटक केली. हा प्रकार केवळ व्यावसायिक वादातून असल्याचे तसेच याला कोणतीही राजकीय किनार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

हर्षल सोनवणे (रा. जाधववाडी, चिखली), शामलिंग चौधरी (रा. मोशी), कीर्तीकुमार लिलारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अजय सुनील फुले (१९, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अजय फुले आणि हर्षल सोनवणे या दोघांचे जाधववाडी परिसरात गॅस शेगड्या दुरुस्तीची दुकाने आहेत. एकमेकांच्या दुकानातील गिऱ्हाईक तोडण्यावरून त्यांच्यात वाद होते. १२ मे रोजी हर्षल याने वाद मिटविण्यासाठी अजय यांना बोलावून घेतले. चर्चा करत असताना हर्षलने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी अजय यांच्या दंडाला लागून ते जखमी झाले. तसेच हर्षलने झाडलेली एक गोळी त्याचाच साथीदार कीर्तीकुमार याच्या मानेला लागली.     एक संशयित जखमी झाला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याचा अंदाज बांधून चिखली पोलिसांनी कीर्तीकुमार याची माहिती डॉक्टरांच्या सोशल मीडिया ग्रुपवर पाठवली. मोरवाडी येथील एका खासगी रुग्णालयात संबंधित संशयित उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खासगी रुग्णालयात धाव घेत संशयित कीर्तीकुमार याची ओळख पटवली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने देखील या गुन्ह्यातील एका संशयिताला ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील संशयित शामलिंग चौधरी हा देहूरोड येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी देहूरोड परिसरातून त्याला ताब्यात घेतले. 

गोळीबार करणारा मुख्य संशयित हर्षल सोनवणे हा गुन्हा केल्यानंतर पळून गेला होता. त्याने त्याचा मोबाईल फोन बंद केला होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान होते. चिखली पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात हर्षल कोणत्या दिशेने गेला याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा माग काढला. पोलिसांनी नाणेकरवाडी चाकण येथून हर्षल याला ताब्यात घेतले.   

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरक्ष कुंभार, चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक निरीक्षक उद्धव खाडे, उपनिरीक्षक महेश मुळीक, दत्तात्रय मोरे, पोलिस अंमलदार बाबा गर्जे, संदीप मसाळ, विश्वास नाणेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटकChikhliचिखलीPoliceपोलिसbusinessव्यवसायPoliticsराजकारण