शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील 'त्या' घटनेला धक्कादायक वळण; लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् केला खून, नेमकं काय घडलं?

By किरण शिंदे | Updated: February 18, 2026 14:11 IST

महिला वेश्याव्यवसाय करणारी महिला असून ८ फेब्रुवारीच्या रात्रीच्या सुमारास ती कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होती

पुणे : पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ४० वर्षीय महिलेचा ६ जणांनी मिळून खून केलाय. शफिया सलीम शेख  (वय ४०, दांडेकर पूल)असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. १० फेब्रुवारी रोजी मांगडेवाडी येथील एका क्रशर खाणीत तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफिया शेख ही महिला वेश्याव्यवसाय करणारी महिला आहे. ८ फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊच्या सुमारास ती कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होत्या. त्यावेळी आरोपी केशव कमलेश चौधरी (२०), सोन्या लक्ष्मण पवार (१८) आणि अब्दुल मोहम्मद शेख (२३) यांनी त्यांना पाहिले. तिघांनी शफिया यांना कात्रज येथील एका लॉजवर घेऊन जायचं ठरवले. मात्र लॉजवर न नेता त्यांना मांगडेवाडी येथील क्रशर खाणीजवळील डोंगरावर नेण्यात आले. त्यानंतर काही वेळातच इतर आरोपी महादेव अर्जुन व्होरडे (४०), साई अमित पुजारी (१९) आणि सोहेल हनीफ खान (२०)  तेथे पोहोचले.

मयत शाफिया आणि आरोपी डोंगरावर मद्यपान करत असताना शफिया यांनी आपल्याला लॉजवर न नेता डोंगरावर का आणले, असा सवाल करत आरोपींसोबत वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात शफिया यांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे ५० ते ५५ फूट खोल असलेल्या खाणीत त्यांना ढकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

मृतदेह सापडल्यानंतर उलगडा

१० फेब्रुवारी रोजी खाणीत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Woman murdered after being lured to quarry; shocking twist.

Web Summary : In Pune, a sex worker was lured to a quarry under the pretext of going to a lodge, then murdered by six men after an argument. All suspects are arrested, and a murder case has been filed. Police are investigating the matter.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याDhankawadiधनकवडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकDeathमृत्यू