शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने सर्वांगावर वार करून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 12:24 PM

प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता

वाघोली : प्रियकराशी झालेल्या वादातून महाविद्यालयीन युवतीने त्याच्यावर स्वयंपाक घरातील चाकूने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली. प्रियकराच्या खोलीत अभ्यासासाठी गेलेल्या युवतीचा वाद झाल्यानंतर तिने प्रियकरावर चाकूने वार केले. प्रियकराशी झालेल्या झटापटीत महाविद्यालयीन युवती जखमी झाली.

यशवंत मुंडे (वय २२, मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. झटापटीत प्रेयसी अनुजा पन्हाळे (वय २१, रा. अहमदनगर) जखमी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत आणि अनुजा वाघोली परिसरातील रायसोनी महाविद्यालयात विदा विज्ञान (डेटा सायन्स) अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. परीक्षा सुरू असल्याने दोघे एकत्रित अभ्यास करायचे. यशवंत रायसोनी महाविद्यालयाजवळ भाडेतत्वावर खोली घेऊन राहत होता. रविवारी रात्री अनुजा त्याचा खोलीवर अभ्यास करण्यासाठी गेली होती.

सोमवारी पहाटे यशवंत आणि अनुजा यांच्यात वाद झाला. त्या वेळी तिने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूने यशवंतवर वार केले. झटापटीत अनुजाला दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या यशवंतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

''यशवंत आणि अनुजा यांच्यात प्रेमसंबंध होते. परीक्षा सुरू असल्याने ती यशवंतच्या खोलीवर अभ्यासासाठी गेली होती. त्या वेळी त्यांच्यात वाद झाली. तिने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूने त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या यशवंतचा मृत्यू झाला. झटापटीत अनुजा जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. - गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे'' 

टॅग्स :Puneपुणेwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टWomenमहिला