शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यातील धक्कादायक घटना! नाना पेठेत तरुणावर ३५ वार करून डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 17:06 IST

समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक

किरण शिंदे 

पुणे : पुण्याच्या नानापेठेत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. अवघ्या 30 सेकंदात या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने 35 वार करण्यात आले. नाना पेठेतील नाना वाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. अक्षय वल्लाळ (वय 33) असे खून झालेल्या या तरुणाचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. 

महेश नारायण बुरा आणि किशोर अशोक शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.. दोघेही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत. याप्रकरणी अतुल गंगाधर गायकवाड (वय 33) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी नाना पेठ परिसरातील नवावाडा परिसरात राहतात. मयत अक्षय वल्लाळ हा त्याच परिसरात राहतो. अक्षय वल्लाळ हा नानापेठ परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर होता. समाजात त्याची चांगली ओळख होती. यामुळेच आरोपी त्याच्यावर चिडून होते.. याच कारणावरून त्यांचे यापूर्वी देखील भांडण झाले होते. 

दरम्यान सोमवारी मध्यरात्री अक्षय हा नानावाडा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी बेसावध असलेल्या अक्षय याच्यावर प्राण घातक हल्ला केला. अवघ्या 30 सेकंदात आरोपींनी त्याच्यावर 35 वार केले. इतकेच नाही तर तो निश्चित पडल्यानंतर सिमेंटच्या ब्लॉकने त्याच्या डोक्यात वार केले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समर्थ पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात खून करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू