दुबईवरून आलेल्या विमानाच्या पुणे विमानळावर तासभर घिरट्या! तासभर विमान हवेतच, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:35 IST2025-07-28T16:33:49+5:302025-07-28T16:35:07+5:30

Pune Airport Marathi news: दुबईवरून पुण्याला आलेल्या एका प्रवासी विमानाला तब्बल तासभर हवेत घिरट्या माराव्या लागल्या. 

A plane from Dubai hovered at Pune airport for an hour! The plane remained in the air for an hour, because... | दुबईवरून आलेल्या विमानाच्या पुणे विमानळावर तासभर घिरट्या! तासभर विमान हवेतच, कारण...

दुबईवरून आलेल्या विमानाच्या पुणे विमानळावर तासभर घिरट्या! तासभर विमान हवेतच, कारण...

Pune Airport News: दुबईवरून नियोजित वेळी पुण्यात आलेल्या (६ ई १४८४) या विमानालाविमानतळावर पार्किंग-बेवर जागा उपलब्ध नसल्याने तासभर हवेतच गिरट्या घालाव्या लागल्या. हा प्रकार शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पुणे विमानतळावर शुक्रवारी रात्री दहा वाजता दुबईवरून नियोजित वेळी विमान पुण्यात आले. परंतु याच वेळेस पार्किंग-बेवर दुसरे विमान थांबले होते. 

दरम्यान, दुबईवरून आलेल्या विमानात २०० प्रवासी होते. जागा नसल्याने या प्रवाशांना विमानात ताटकळत बसून राहावे लागते. एक तासानंतर रात्री अकरा वाजता जागा मिळाल्यावर विमान खाली उतरले. त्यानंतर इमिग्रेशन आणि बॅगा घेण्यासाठी प्रवाशांना तासभर वाट पाहावी लागली. 

प्रवाशांना गैरसोयीचा फटका बसल्याने मनस्ताप सहन सहावा लागला. याबाबत विमानतळ प्रशासनांच्या नियोजनाच्या अभावाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.

Web Title: A plane from Dubai hovered at Pune airport for an hour! The plane remained in the air for an hour, because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.