शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना भाजप उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं कारण नाही-शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 15:20 IST

सध्या देशात बदल करण्याची भावना दिसत असून निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात असल्याचे चित्र आहे

बारामती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता. त्यावरून शरद पवारांनी बावनकुळे यांना  टोला लगावला आहे. ज्या व्यक्तिला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी योग्य समजत नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. असं पवार म्हणाले आहेत. पवार हे रविवारी बारामती (दि २२) दाैर्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी निवडणूकीवर भाष्य केले. 

पवार म्हणाले, बारामतीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. अखंड देशाला बारामतीचे महत्व माहिती आहे. म्हणूनच ते वारंवार बारामतीचे नाव घेतात.   त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं. त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, असे म्हणत पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना टोला लगावला. सध्या निवडणुका लागलेल्या पाच राज्यांमध्ये भाजपला लोक बाजूला करतील असे चित्र आहे. सध्या बदल करण्याची भावना देशामध्ये आहे. देशातील ७० टक्के राज्यांमध्ये भाजप नाही. अन् जिथे या निवडणुका आहेत. या निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात असल्याचे दिसते असे त्यांनी यावेळी सांगितले.

 जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते. याबाबत सरकार काय करते आहे याकडे आमचे लक्ष आहे. या दोन दिवसानंतर सरकारची भूमिका स्पष्ट होईल असं दिसत आहे. यातून मार्ग निघाला, प्रश्न सुटला तर मनापासून आनंद होईल,असे पवार म्हणाले.

कंत्राटी भरती बाबत बोलताना पवार म्हणाले, मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही.जाण्याचे काय कारण नाही. महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाच मत तुम्ही सांगितलं. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आज त्याच्यावर टिप्पणी केली आहे. त्यात हे स्पष्ट दिसते की ज्या वेळेला त्यासंबंधीचा निर्णय घेतला गेला. त्या निर्णयाच्या बैठकीला अनेक सहकारी हजर होते. ते आजही सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची संमती होती. आज त्यासंबंधीचं भाष्य करत नाहीत. कंत्राटी कामगारांच्या संबंधीची अस्वस्थता कशाची होती. नोकरीमध्ये शाश्वती नाही. ठराविक काळासाठीच नोकरी आहे. दहा अकरा महिन्यांची नोकरी म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जागा भरणे योग्य नाही. 

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, इंडिया आघाडीमध्ये जे जे लोक सहभागी होतील. त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. मात्र कालची बैठक ही त्यासाठी नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'प्रॉब्लेम ऑफ रुपीज' या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरला कार्यक्रम होता या संदर्भासाठी आम्ही एकत्रित होतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा