शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणाच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात घट; वीज पुरवठ्यात २ तास कपात, पाणी उपशावर बंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 15:23 IST

महावितरण कंपनीने शेती सिंचनाच्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात केल्याने ८ तास दिली जाणारी वीज आता ६ तासच मिळणार

कळस : जायकवाडी नंतर राज्यातील दोन नंबरचे ११७ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या उजनी धरणातील पाणी ३८ टक्के उणे पातळीत गेल्याने  जलाशयावरील पाणी उपशावर बंधन घालण्यात आले आहे. महावितरण कंपनीने शेती सिंचनाच्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात केली आहे. आठ तास दिली जाणारी वीज आता सहा तासच मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली दरवर्षी वीस टीएमसी नदीपात्रात वाया जाते. मात्र प्रशासनाकडून धरणग्रस्तांच्या पाणी उपशावर बंधन आणण्यासाठी दोन तास वीज कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील २८ गावे उजनी धरणात बुडीत तर ५ गावे बाधित झाली. या गावांतील शेतकऱ्यांना धरणाच्या निर्मितीनंतर सुरवातीला बारमाही पाणी उपशाचे परवाने देण्यात आले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून आता आठमाही पाणी परवाने दिले जात आहेत. यंदा धरण ६० टक्के भरल्याने पाण्याचे वेळीच योग्य नियोजन झाले नाही. पाणीसाठा आज उणे ३७.४७ टक्क्यांवर पोचला आहे धरण यावर्षी प्रथमच उजनीच्या इतिहासात उणे ७० टक्के होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून जिल्हाधिकाऱ्यांना उजनीच्या उपसा सिंचन धारकांच्या पाणी वापरावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे नमूद करत, जिल्ह्यातील दौंड व इंदापूर तालुक्यातील सिंचनाच्या पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी वीज कपातीची मागणी पत्रव्यवहाव्दारे केली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बारामतीच्या विद्युत कंपनीचे अधीक्षक अभियंत्यांना वीज पुरवठ्यात दोन तास कपात करण्याची सूचना केली आहे. यानुसार तालुक्यातील वीज पुरवठ्यात दोन तासांची कपात करुन वीज पुरवठ्याचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. उजनीलगतच्या कांदलगाव, शहा, शिरसोडी, पडस्थळ, अजोती, कालठण, गंगावळण, कळाशी, चांडगाव, पळसदेव, डाळज, कुंभारगाव, भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, भावडी, अगोती यांसारख्या निव्वळ उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या हजारो ट्रान्सफार्मचा वीज पुरवठा कपात करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरीmahavitaranमहावितरणelectricityवीज