शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Yerwada Jail: येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला

By नम्रता फडणीस | Updated: July 15, 2024 16:32 IST

कैद्याची वर्तवणूक चांगली असल्याने त्याची रवानगी कारागृह प्रशासनाने खुल्या कारागृहात केली होती

पुणे : देवीपाडा गावात एकाचा खून केल्या प्रकरणात येरवड्यातील खुल्या कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सायंकाळी कैद्यांची हजेरी घेताना तो उपस्थित नसल्याचे आढळल्याने त्याची शोधाशोध सुरु केली. तेव्हा हा कैदी पळाल्याचे उघडकीस आले .

आत्माराम उर्फ आत्म्या लाडक्या भवर असे पळून गेलेल्या  कैद्याचे नाव आहे. भवर हा मूळचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या देवीपाडा गावचा रहिवासी. २००९ मध्ये त्यााने देवीपाडा गावात एकाचा खून केला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला जन्मठेप आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. दंड न भरल्यास सहा महिने कारवास भोगावा  लागेल, अशी तरतूद न्यायालयाने आदेशात केली होती. तेव्हापासून भवर येरवडा कारागृहात होता. दरम्यान, भवरची वर्तवणूक चांगली असल्याने त्याची रवानगी कारागृह प्रशासनाने खुल्या कारागृहात केली होती. खुल्या कारागृहातील कैदी शेती करतात. शनिवारी दिवसभर भवर खुल्या कारागृहात होता. कारागृहात रक्षक तौसिफ सय्यद यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास कैद्यांची हजेरी घेण्यात आली. तेव्हा भवर उपस्थित नसल्याचे आढळून आले. कारागृहातील रक्षकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर याबाबत येरवडा कारागृहातील अधिकारी हेमंत पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पसार झालेल्या भवरचा शोध घेण्यात येत असून, पोलीस अंमलदार जाधव तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेyerwada jailयेरवडा जेलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक