चाकणला गजबजलेल्या भागातून बलदंड बिबट्या जेरबंद; महिलेवर केला होता हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 10:42 AM2022-12-21T10:42:09+5:302022-12-21T10:43:22+5:30

सापळा लावून बिबट्याला पकडण्यात यश...

A large number of leopards have been jailed from the congested area of Chakan; A woman was attacked | चाकणला गजबजलेल्या भागातून बलदंड बिबट्या जेरबंद; महिलेवर केला होता हल्ला

चाकणला गजबजलेल्या भागातून बलदंड बिबट्या जेरबंद; महिलेवर केला होता हल्ला

googlenewsNext

चाकण (पुणे) : दिवसेंदिवस विस्तारत चाललेल्या मानवी वसाहतीत बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढत चालला असून, दाट लोकवस्तीत शिकारीच्या शोधात येणाऱ्या बिबट्यांची संख्याही त्या तुलनेत जास्त वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चाकण जवळील नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथे वाहनांच्या धडकेत जखमी असलेला बलदंड बिबट्या असल्याची माहिती मिळताच वनविभागाने मोठ्या शिताफीने सापळा लावून त्याला पकडण्यात यश मिळविले.

पुणे-नाशिक महामार्गालगतच्या नाणेकरवाडी फाटा भागातील लोकवस्तीने गजबजलेल्या ठिकाणी पत्रा चाळींमधील बोळीत एक पट्टेरी रंगाचा बलदंड बिबट्या ठाण मांडून बसल्याची माहिती पहाटेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांना मिळाली.

पुणे-नाशिक महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या अवस्थेत बिबट्या दोन सहा खोल्यांच्या चाळींच्या मधील बोळात बसला होता. बिबट्याने एक महिला घराबाहेर पडल्यावर तिच्यावर बिबट्याने हल्ला चढवला. मात्र महिलेने आरडाओरडा करत स्वतःला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. सदर महिला किरकोळ जखमी झाली आहे. दोन चाळींमधील जागा अरुंद असल्याने संबंधित ठिकाणी मोठ्या धाडसाने त्यांनी सापळा लावला. बिबट्या निवारण केंद्राच्या जवानांनी त्या ठिकाणी जीव धोक्यात घालून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर चित्तथरारक बचाव कार्य सुरू केले.

चाकण वनविभाग रेस्क्यू टीम,चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिनगारे,पोलिस निरीक्षक अनिल देवडे,नेचर गार्ड ऑर्गनायझेशन,फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनच्या मदतीने बिबट्या जेरबंद करण्यासाठी मदत केली. रेस्क्यू टीमच्या जवानांनी अगदी जीव धोक्यात घालून बिबट्या ज्या ठिकाणी दडून बसला होता,त्या ठिकाणी बंदुकीतून त्याला दोन गोळ्या मारल्या. बिबट्या बेशुद्ध पडल्याची पक्की खात्री होताच सर्वानी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. त्यामुळे सर्वांनी अखेरचा सुटकेचा नि:श्वास सोडला. बिबट्याचे रेस्क्यू सुरू असताना परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

जवळील आळंदी वनविभागाच्या जंगलातून सदर बिबट्या रस्ता भटकल्याने नाणेकरवाडी परिसरातील गजबजलेल्या ठिकाणी आला होता,बलदंड बिबट्याला मोठ्या चित्तथरारक परिस्थितीत आणि बेशुद्ध अवस्थेत ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर जुन्नर बिबट्या निवारा केंद्रात तातडीचे उपचार सुरू करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

- योगेश महाजन,वनाधिकारी,चाकण वन परिक्षेत्र.

Web Title: A large number of leopards have been jailed from the congested area of Chakan; A woman was attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.