शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मानवाधिकार संघटनेची धमकी देत मजुराची तब्बल २ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 13:04 IST

मोलमजुरीवर उपजीविका करणाऱ्याने दोन गुंठे प्लॉट घेण्यासाठी दोन लाख दिले होते

बारामती :मानवाधिकार संघटनेची धमकी देत बारामती येथे एकाने मजुराला २ लाख ६५ हजाराचा गंडा घातला आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमीन हंबीर शेख (रा. स्नेह कुंज अपार्टमेंट भिगवन रोड) हा ऑल इंडिया मानवाधिकार संघटनेशी सबंधित आहे.  त्याच्या विरोधात नवनाथ सोमनाथ माने यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवनाथ माने हा मोलमजुरी करून आपली उपजीविका करतो. बारामती शहरांमध्ये आपल्याला स्वत:ला राहण्यासाठी जागा असावी म्हणून त्याने ऑल इंडिया मानवाधिकार संघटनेचा अमीन हंबीर शेख याला धनादेशाद्वारे ऑनलाईन व रोख स्वरूपात २ लाख ६५ हजार रुपये दोन गुंठे प्लॉट घेण्यासाठी दिले.  त्यांनी प्लॉटही दाखवला परंतु प्रत्यक्षात तो प्लॉट शेख याने नवनाथ माने यांना दिला नाही.  त्यानंतर वेळोवेळी त्यांनी प्लॉट देण्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, माने यांना संघटनेची भीती घालण्यात आली. पोलिसांनी देखील शेख याला  दोन वेळा नवनाथ माने या गरीबाचे पैसे देऊन टाका, अशी समज दिली. परंतु दोन-तीन महिने होऊन सुद्धा शेक याने टोलवाटीवी केली.  नंतर फिर्यादी नवनाथ माने यांनी शेख याला समक्ष भेटून पैसे देण्याबाबत विनंती केली. मात्र शेख याने माने यांना जातीवाचक शिवीगाळ करून पुन्हा संघटनेची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी शेख याच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी