शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात क्वार्टर गेट परिसरातील गोदामाला रात्री भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 05:10 IST

स्पेअर्स पार्ट, फायबरचा कारखाना जळून खाक, एक जण जखमी

पुणे :  नाना पेठेतील न्यू क्वार्टर गेट चौक परिसरात गोदामाला भीषण आग लागून त्यात बाजूची दुकाने, कारखाना जळून खाक झाला. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीत स्पेअर्स पार्टचे दुकान, फायबरचा कारखाना, आंब्याचे गोदाम जळून खाक झाले आहे. मध्यरात्रीनंतर आग विझविण्याचे काम सुरु होते.

नाना पेठेतील आंबेडकर कॉलेज शेजारी कावेरी सोसायटी आहे़ या सोसायटीला लागून गल्लीत अनेक दुकाने, गोदाम आहेत. त्यातील एका गोदामाला रात्री साडेअकरा वाजता भीषण आग लागली. अग्निशामक दलाला याची खबर रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर १० अग्निशामक दलाचे गाड्या, ३ वॉटर टँकर, ३ रुग्णावाकिा घटनास्थळी रवाना झाले. सुमारे ४ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम असून त्याच्या पुढे ३ दुकाने आहेत. या दुकानात गादीचा कारखाना, लाकडी फर्निचर, दुचाकी, चारचाकीच्या स्पेअर्स पार्ट तसेच गाड्यांसाठी लागणाºया फायबरच्या पार्ट बनविणारा कारखाना आहे. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री १ वाजल्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत संपूर्ण दुकाने, कारखाना जळून खाक झाला आहे. या आगीत एकाच्या पायाला भाजले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून अजून कुलिंगचे काम बराच वेळ चालणार असल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख सुनिल गिलबिले यांनी सांगितले. या दुर्घटनेच्या  बाजूलाच राजेवाडी झोपडपट्टी येथे मांगीरबाब उत्सव सुरू आहे़ त्यामुळे कार्यकर्ते काम करत जागे होत़े  या कार्यकर्त्यांनी गाड्या बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.अग्निशमन दलाचे अधिकारी जखमी आग विझविण्याचे काम करीत असताना अंधार असल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी प्रभाकर उमरटकर यांच्या पायाला कापल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

टॅग्स :PuneपुणेFire Brigadeअग्निशमन दलfireआग