शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पुण्यात हृदयाचा थरकाप उडवणारी घटना! नातवानेच मालमत्तेसाठी आजीचा खून करून केले तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 09:37 IST

धक्कादायक म्हणजे या नराधमाने लाकडे कापण्याच्या इलेक्ट्रिक कटरने तिच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकून दिल्याचे समाेर आले

पुणे : मालमत्तेसाठी नातवानेच आजीचा खून केल्याचा प्रकार पुण्यात मुंढवा भागात घडला. धक्कादायक म्हणजे या नराधमाने लाकडे कापण्याच्या इलेक्ट्रिक कटरने तिच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकून दिल्याचे समाेर आले आहे. उषा विठ्ठल गायकवाड (वय ६२, रा. म्हसोबानगर, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी साहील उर्फ गुड्डू संदीप गायकवाड (वय २०), संदीप विठ्ठल गायकवाड (वय ४२, दाेघेही रा. म्हसोबानगर, केशवनगर, मुंढवा) या दोघा बाप-लेकाला अटक केली आहे. संदीप हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उषा गायकवाड यांच्या मुलीने दिलेली तक्रार आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा मिळून आलेला पाय व अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे.

उषा गायकवाड सरकारी खात्यातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांनी म्हसोबानगर येथे जागा घेऊन घर बांधले आहे. निवृत्त झाल्यापासून त्या मुलगा, नातू व सुनेसोबत एकत्र राहत होत्या. त्यांनी मुलाला काही पैसे हातउसने दिले होते. त्यामुळे मालमत्तेच्या वादातून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. त्यावेळी उषा या साहिल व त्याचे वडील संदीप यांना घर सोडून जाण्यास सांगत असत. त्यामुळे साहिल हा नेहमीच आजी उषा यांच्यावर चिडून असायचा. त्यातूनच त्याने ५ ऑगस्ट रोजी उषा या घरात झोपल्या असताना, दुपारी त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी व पोलिसांना गुंगारा देण्यासाठी उषा वापरत असलेला मोबाईल त्यांच्या काशेवाडी परिसरात ठेवून दिला.

मंगळवार पेठेतून झाडे कापण्याचे इलेक्ट्रिक कटर घेऊन येत उषा यांच्या शरीराचे तुकडे केले. यानंतर ते तुकडे दुचाकी व चारचाकी गाडीतून पोत्यात भरून सुरुवातीला केशवनगर येथील जॅकवेल कचरा डेपोच्या बाजूला मुळा-मुठा नदीपात्रात, तसेच थेऊर येथील नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात टाकून दिले. त्यानंतर घरी येऊन इलेक्ट्रिक कटर व रक्ताने भरलेले कपडे मांजरी येथे नदीपात्रात टाकून दिले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, गुन्हे निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश मराठे, संतोष जगताप, वैभव मोरे, राजू कदम, महेश पाठक, योगेश गायकवाड, नीलेश पालवे, दिनेश भांदुर्गे यांनी केली.

असा लागला छडा

- उषा गायकवाड यांची मुलगी शीतल कांबळे (वय ४०) हिने मुंढवा पोलीस ठाण्यात आईच्या अपहरणाची तक्रार देऊन तिच्या जीवाचे बरेवाईट झाल्याची शंका व्यक्त केली होती. त्यानुसार पोलिसांनी नातू साहिल व मुलगा संदीप यांना ताब्यात घेतले. तसेच साहिलची सख्खी व सावत्र आई अशा दोघींकडे चौकशी केली. त्यावेळी पोलिसांना सर्वांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली.- पोलिसांनी प्रत्येक एका व्यक्तीकडे केलेल्या चौकशीत साहिल याच्या दोन्ही आईंनी पोलिसांना खरे वास्तव कथन केले. त्यानुसार पोलिसांनी साहिल व संदीप या दोघांना पोलिसी खाक्या दाखवला. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.- वाडेगाव येथे मिळालेला पाय आणि डीएनएचा अहवाल सकारात्मक मिळाल्याने तो पाय उषा यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाArrestअटकPoliceपोलिस