शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
4
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
5
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
6
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
7
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
8
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
9
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
10
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
11
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
12
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
13
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
15
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
16
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
17
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
18
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
19
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
20
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

पेरू विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा धारदार हत्याराने वार करून खून; सिंहगड रस्त्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 09:51 IST

धारदार हत्याराने वार करून मृतदेह झुडपात टाकून देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला

धायरी: अज्ञात कारणांवरून एका ३६ वर्षीय व्यक्तीचा धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला असून हा प्रकार सोमवारी सकाळी उघडीस आला आहे. राहुल चंद्रकांत आटोळे ( वय: ३६ वर्षे, रा. गोसावी वस्ती नांदेड ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.  

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड भागात राहणारे राहुल आटोळे हे पेरू विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी सकाळी काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपात एक मृतदेह आढळून आला. याबाबत नागरिकांनी हवेली पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे , पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस हवालदार अशोक तारू, पोलीस नाईक संतोष भापकर, राजेंद्र मुंडे, प्रवीण ताकवणे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. धारदार हत्याराने वार करून मृतदेह झुडपात टाकून देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे. त्यांचा खून कोणत्या कारणावरून झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून त्यानंतर शवविच्छेदनसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.  पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी