शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानोबा अन् तुकोबांच्या पालखीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; ७ हजारांचा पोलिस फौजफाटा तैनात

By नितीश गोवंडे | Updated: June 9, 2023 15:02 IST

यंदा होणारी विक्रमी गर्दी विचारात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताचे कडेकोट नियोजन

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ड्रोनद्वारे पालखीवर पोलिसांची नजर असणार असून, दिंड्या व पोलिसांच्या समन्वयासाठी दहा दिंड्यासोबत एक वॉकीटॉकी सोबत असलेला कर्चमचारी तैनात असणार आहे. यंदा होणारी विक्रमी गर्दी विचारात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताचे कडेकोट नियोजन केले आहे. पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षकांसह होमगार्ड, एसआरपीएफ, बीडीडीएस पथके आणि स्थानिक पोलिस असा ७ हजारांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत.

१० जून रोजी देहू येथून जगदगुरू तुकाराम महाराज व ११ जून रोजी आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. दोन्ही पालख्यांचे १२ जून रोजी पुण्यात आगमन होणार असून १२ व १३ जून रोजी पालख्या पुण्यात मुक्कामी असणार आहेत. नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे जगदगुरू तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असते, तर भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्कामी थांबणार आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यापासून वाहतुकीचे नियोजन करण्यापर्यंतची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते.

पाटील इस्टेट येथे १२ जून रोजी दोन्ही पालख्यांचे आगमन होईल, यावेळी पालख्यांच्या स्वागतासाठी वारकर्‍यांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. यानंतर येथून दोन्ही पालख्या नियोजनानुसार भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर व नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी असणार आहेत. या ठिकाणीदेखील पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. दोन्ही पालख्या १४ जून रोजी सकाळी सहा वाजता शहरातून बाहेर प्रस्थान करणार आहेत.दरम्यान यावेळी वाहतूक पोलिसांचा देखील स्वतंत्र बंदोबस्त असणार असून नागरिकांना अडचण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

साध्या वेशात गुन्हे शाखेची पथके तैनात...

पालखी सोहळ्यात होणार्‍या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून साध्या वेशात २५० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहे. सराईत चोरट्यांची यादी तयार करून त्यांची फोटोद्वारे माहिती जमा करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास महिला पोलिसांची पथके वारी सोहळ्यात पहारा देणार आहेत. अशी माहिती गुन्हेशाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.

असा असेल पोलिस बंदोबस्त..

पोलीस उपायुक्त  - १०सहायक पोलीस आयुक्त - २०पोलीस निरीक्षक - ९७एपीआय, पीएसआय - ३२८अंमलदार  -  ३ हजार ४दोन एसआरपीएफच्या तुकड्याहोमगार्ड - ७००

ड्रोन व जीपीएसद्वारे पालखीचे लाईव्ह लोकेशन आपल्याला समजणार

वारी सोहळ्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्यात आले आहे. दोन सत्रात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ड्रोन व जीपीएसद्वारे पालखीचे लाईव्ह लोकेशन आपल्याला समजणार आहे. - रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकारामashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Templeमंदिर