शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: जीममध्ये दाम्पत्याला आरेरावी करत केली मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: December 28, 2023 16:26 IST

याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

पुणे : सोसायटीच्या जीममध्ये व्यायाम करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला ‘जीम मधून बाहेर जा’ असे म्हणत चार जणांनी शिवीगाळ केली. तसेच जीम मधील कठीण वस्तूने डोळ्यावर मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. हा प्रकार एनआयबीएम रोडवरील एलीना लिव्हींग सोसायटीच्या जीममध्ये मंगळवारी (दि. २६) रात्री नऊच्या सुमारास घडला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जखमी संदिप आगरवाल यांची पत्नी श्वेता संदिप आगरवाल यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २७) फिर्याद दिली आहे. यावरून रुपेश चव्हाण (३५), सागर शेजुळ (३७), राजू बिंद्रा (४०) आणि सॅम्युअल (३५, सर्व रा. एलीना लिव्हींग, एनआयबीएम रोड, मोहम्मदवाडी) यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच सोसायटीत राहतात. मंगळवारी रात्री फिर्यादी व त्यांचे पती सोसायटीच्या जीममध्ये गेले होते. त्यावेळी आरोपी रुपेश चव्हाण याने ‘हि जिम सोसायटीमधील ए व बी विंग मधील सभासदांसाठी नाही, तुम्ही बाहेर जा’ असे म्हणत श्वेता यांच्या पतीसोबत वाद घालून शिवीगाळ केली.त्यावेळी श्वेता या मध्यस्थी करत असताना सॅम्युअल त्यांच्या अंगावर धावून आला, आणि त्याने तुम्ही जिममध्ये येऊ शकत नाही असे सांगण्यास सुरूवात केली. त्याचवेळी राजू बिंद्रा याने संदिप आगरवाल यांना पाठीमागून पकडले. तर रुपेश चव्हाण याने जीममधील कठीण वस्तूने संदीप यांच्या डाव्या डोळ्यावर मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनावणे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस