शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

खंडाळा घाटातील अंडा पाॅईटजवळ कंटेनर आणि पिकअपचा भीषण अपघात; एक ठार, दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 10:24 IST

जखमींमध्ये एका शाळकरी मुलाचा समावेश आहे...

लोणावळा (पुणे) : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाटातील अंडा पॉईंट येथील वळणावर एक भरधाव वेगातील कंटेनर समोर जाणाऱ्या दोन पिकअप टेम्पोला धडकून एका पिकअप टेम्पोवर पलटी झाला. या भीषण अपघातामध्ये पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका शाळकरी मुलाचा समावेश आहे. आज सकाळी हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने सदर कंटेनर भरधाव वेगात निघाला होता. अंडा पॉईंट येथील उतार व वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने दोन पिकअप टेम्पो गाड्यांना धडक दिली व पलटी झाला. यावेळी एक पिकअप गाडी कंटेनरच्या खाली गेली. यामध्ये पिकअप चालकाचा गाडीमध्ये अडकल्याने मृत्यू झाला तर जखमी दोघांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची देवदूत यंत्रणा व खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रेस्क्यू करत बाहेर काढत उपचारासाठी दाखल केले.

अपघाताची माहिती समजल्यानंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस, आय आर बी, यांच्यासह विविध यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करत पिकप गाडी व आत मध्ये अडकलेला चालक यांना काढण्याचे कार्य सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस