शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाषाण टेकडीवर महाविद्यालयीन युवतीला लुटले, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 16:00 IST

संबंधित तरूणीच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोनसाखळी भर दुपारी हिसकावून नेण्यात आल्याने, परिसरात भीतीचे वातावरण आहे....

पुणे : शहरात दिवसेंदिवस लुटमारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पिस्तुलाचा धाक दाखवत एका २५ वर्षीय तरूणाला १२ जणांची लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. यानंतर आता २२ वर्षीय महाविद्यालयीन युवतीला पाषाण टेकडीवर दोघांनी लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरूणीच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोनसाखळी भर दुपारी हिसकावून नेण्यात आल्याने, परिसरात भीतीचे वातावरण आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रविवार रोजी दुपारी तक्रारदार युवती आणि तिचे मित्र-मैत्रिण पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडीवर फिरायला गेले होते. यावेळी दोन लुटारूंनी युवती आणि त्याच्या सोबत असलेल्या मित्र-मैत्रिणीला धमकावले. त्यानंतर तिच्या गळ्यातील ५० हजारांची सोन्याची चैन हिसकावून चोरटे पसार झाले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडीवर यापूर्वी देखील फिरायला गेलेल्या नागरिकांना चोरट्यांनी लुटल्याच्या घटना घडल्या आहेत, तसेच शहरातील विविध भागांमध्ये देखील या घटना घडत आहेत, त्यामुळे पोलिस प्रशासनासमोर या चोरट्यांनी आवाहन निर्माण केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस