शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या नामांकित शाळेतील दहावीची विद्यार्थिनी गर्भवती; चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 14:32 IST

16 वर्षीय तरुणी गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस...

किरण शिंदे/ प्रतिनिधी पुणे : पुण्यातील खडकी परिसरातील एका नामांकित शाळेतील दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी एक 16 वर्षीय तरुणी गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीच्या मैत्रिणीच्या भावाचा मित्र असलेल्या एका तरुणाने तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले आणि यातून ही तरुणी चार महिन्याची गर्भवती राहिली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 16 वर्षीय पीडित मुलीने या प्रकरणी तक्रार दिली आहे

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेते. एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची आणि आरोपी तरुणाची ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपी तरुणाने तिला गप्पा मारण्यासाठी खडकी परिसरातीलच एका लॉजवर घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यासोबत जबरदस्ती करत शरीर संबंध ठेवले.

खडकी परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर चार ते पाच वेळा हा प्रकार घडला. याविषयी कुणाला काही सांगितल्यास तुझ्या आई व बहिणीला सोडणार नाही अशी धमकी त्याने पीडित मुलीला दिली होती. दरम्यान या सर्व प्रकारातून पीडित तरुणी 4 महिन्याची गर्भवती राहिली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अधिक तपास खडकी पोलीस करत आहे.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी