शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Baramati: बारामतीत पोलीस आणि सराफाविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 12:00 IST

यामध्ये एका पोलीसासह सराफाविरोधात बलात्कारप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

बारामती (पुणे) : ८० तोळे सोने घेऊन त्या बदल्यात फक्त वीस लाख रुपये देऊन उर्वरित सोन्याचा अपहार करुन एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीतील सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणांमध्ये दोन पोलीस कर्मचारी, सराफ व त्याचा मुलगा यांच्यावर  गुन्हा दाखल झाला आहे. तसेच यामध्ये एका पोलीसासह सराफाविरोधात बलात्कारप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी शिवाजी राजाराम निकम, भरत ओसवाल, कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम, समीर शेख व दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामधील शिवाजी निकम हे वालचंदनगर पोलीस ठाण्यात तर श्रीकांत निकम हे अकलूज पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत आहेत.यामध्ये शिवाजी निकम, भरत ओसवाल यांच्याविरुद्ध बलात्काराचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तर इतर सर्वांविरुद्ध फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित महिलेकडून ८० तोळे सोने घेऊन त्या बदल्यात फक्त वीस लाख रुपये देऊन उर्वरित सोन्याचा अपहर करून फियार्दीची फसवणूक केली. तसेच सोने परत देतो म्हणून शक्ती प्लाझा खाटीक गल्ली बारामती येथे बोलावून तिच्यावर बलात्कार केला. जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम व समीर शेख यांनी फियार्दीस गरुड बाग येथे बोलावून जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याची  फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश  करीत आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर बारामतीत खळबळ उडाली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग