पुणे क्राईम : चंद्रकांत टिंगरे यांना मारहाणप्रकरणी दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल
By नम्रता फडणीस | Updated: November 21, 2024 11:00 IST2024-11-21T11:00:07+5:302024-11-21T11:00:07+5:30
राष्ट्रवादीचे उमेदवार बापू पठारेंना पाठिंबा दिल्याने मारहाण केल्याची तक्रार

पुणे क्राईम : चंद्रकांत टिंगरे यांना मारहाणप्रकरणी दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल
पुणे : वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार बापू पठारे यांना पाठिंबा दिल्याने चंद्रकांत टिंगरे यांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी रेखा (वय ५२, रा. कमल निवास, भैरवनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माझे पती चंद्रकांत टिंगरे यांनी आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (अजित पवार गट) शरद पवार गटात प्रवेश केला. वडगाव शेरीतील उमेदवार बापू पठारे यांना पाठिंबा दिल्याने विरोधक आमच्यावर चिडून होते. चंद्रकांत टिंगरे मंगळवारी दुपारी धानोरी भागातून निघाले होते. त्यावेळी दोघांनी कार अडविली. कारवर दगडफेक करून पती चंद्रकांत यांना मारहाण केली, असे रेखा टिंगरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
रेखा टिंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली होती. पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करत आहेत.