शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर वार करून आरोपी झाले फरार; 7 दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 21:01 IST

पोलीस पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप व धारदार शस्त्र जप्त केले

पुणे : व्यावसायिकावर भरदिवसा कोयता, लोखंडी सळई व अन्य धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले.  त्याच्याकडील लॅपटॉप व रोख रक्कम चोरुन नेणा-या तिघांना विमानतळ पोलिसांनीअटक केली.  त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप व धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.       महादेव सुभाष साठे (वय 21), सोमनाथ संजय कांबळे (वय 19), अनुराग भुजंग ससाणे (वय 19, तिघेही रा. यमुनानगर, विमाननगर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धांत चंपालाल चोरडीया (वय 30, रा.आळंदी रस्ता) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरडीया हे व्यावसायिक आहेत. ते 3 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास नगर रस्त्यावरील मंत्री आयटी पार्कजवळच्या दुकानासमोर सरबत घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्याकडील लॅपटॉप जबरदस्तीने हिसकावून घेतला. लॅपटॉप परत करण्यासाठी फिर्यादीकडे अडीच हजार रुपयांची मागणी केल्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या खिशातील अडीच हजार रुपये, लॅपटॉपजबरदस्तीने काढून घेतला. तसेच फियार्दीवर कोयता, लोखंडी सळई व अन्य धारदार शस्त्रांनी वार करुन आरोपी तेथून पळून गेले. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला.

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी हे फोर पॉईंट हॉटेलजवळच्या मोकळ्या जागेत बसल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे, गणेश साळुंखे उमेश धेंडे, रमेश लोहकरे, सचिन जाधव यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप व धारदार शस्त्र जप्त केले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक