Pune | नगर-कल्याण महामार्गारील अपघातात आळे येथील दुचाकीस्वार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 19:05 IST2023-03-25T19:02:57+5:302023-03-25T19:05:02+5:30
अज्ञात वाहन व त्यावरील चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल...

Pune | नगर-कल्याण महामार्गारील अपघातात आळे येथील दुचाकीस्वार ठार
आळेफाटा (पुणे) : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी सहा वाजता नगर-कल्याण महामार्गावर आळे परिसरात घडली.
अर्जुन भाऊ कुऱ्हाडे (वय ३६, रा. कैचानमळा आळे. ता. जुन्नर) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळे बाजूने अर्जुन कुऱ्हाडे नगर-कल्याण महामार्गाने दुचाकीवरून (क्रमांक एमएच १४ एम ९६४६) हे बोरीकडे जात असताना परिसरातील माउली ढाब्यासमोर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन व त्यावरील चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय शिंगाडे तपास करीत आहेत.