शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

बारामतीत ६५ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 18:42 IST

या आजाराच्या तपासणीसाठी आवश्यक नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणु प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत

- प्रशांत ननावरे बारामती - बारामती शहरात तांदुळवाडी परीसरातील एका ६५ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे आढळली आहेत.या रुग्णावर बारामती शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.त्यांची प्रकृती स`थिर असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

बारामतीकर ज्येष्ठ नागरीक पुणे शहरात एका सत्संग कार्यक्रमासाठी गेले होते.बारामतीत परतल्यावर त्यांना एका रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे आढळल्याचे दिसुन आले. त्यानंतर त्यांच्या या आजाराच्या तपासणीसाठी आवश्यक नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणु प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत.बुधवारी(दि ५)सायंकाळपर्यंत याबाबतचा अहवाल प्राप्त झालेला नव्हता.दरम्यान, जीबी सिंड्रोम चे रुग्णांची पुणे जिल्ह्यातील या रुग्णांची संख्या आता २० वर पोहोचली आहे. तसेच बारामती येथील २६ वर्षीय युवती पुणे शहरात शिक्षणास वास्तव्यास आहे.ती युवती काही दिवसांपुर्वी एक दोन दिवसांसाठी तिच्या बारामती येथील घरी आली होती.यावेळी तिला अन्न गिळण्यास त्रास झाला.त्यानंतरतिला बारामतीत प्राथमिक उपचार घेतल्यानंतर थेट पुण्यात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तिच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.या युवतीची प्रकृती स`थिर असल्याचे आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकारी डाॅ.सुप्रिया सावरकर यांनी सांगितले.या युवतीला जीबी सिंड्रोम आजाराची लागण झाल्यचे निष्पन्न झाले आहे.तसेच हि युवती पुणे शहरात वास्तव्यास आहेत.बारामतीत आल्यानंतर तिला हा त्रास जाणवला.त्यामुळे पुणे शहरातच तिला या आजाराची लागण झाल्याचा अंदाज आहे.बारामतीत एकही रुग्ण नाही.बारामतीत काेणालाही या आजाराची लागण झालेली नाही.युवती आणि जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे आढळलेले ज्येष्ठ नागरीक या दोघांची पुणे प्रवासाची ‘हिस्ट्री’ आहे.त्यामुळे त्या युवतीची पुणे शहरात नोंद करण्यात आलेली आहे.तर ज्येष्ठ नागरीकांचा अहवाल अद्याप आलेला नाही.बारामती नगरपरीषदेच्या पिण्याच्या पाण्यचा अहवाल उत्तम आहे.शिवाय काही खासगी विंधनविहींरींच्या पाण्याचा अहवाल चांगला असल्याचे डाॅ.सावरकर यांनी सांगितले.

बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.महेश जगताप यांनी सांगितले,नागरीकांनी स्वच्छ पाणी प्यावे.ताप,अशक्तपणा सारखी लक्षणे आढळल्या जवळच्या रुग्णालयात संपर्क साधावा.बारामतीत आवश्यक यंत्रणा सज्ज आहे.नागरीकांनी घाबरुन जावू नये,असे आवाहन डाॅ.जगताप यांनी केले आहे.बारामती तालुका अधिकारी डाॅ.मनोज खाेमणे यांनी सांगितले की,आरोग्य विभागाचा नियमित सर्व्हे सुरुच असतो.त्या प्रमाणे या आजाराचा गावोगावी सर्व्हे करण्यात आला.यामध्ये एक लाख नागरीकांमध्ये एक दोन रुग्ण आढळतात.हे ‘नाॅर्मल’ आहे.मात्र, एखाद्या ठराविक भागात अधिक रुग्ण आढळल्यास त्या आजाराची साथ पसरल्याचे मानले जाते.बारामतीत अशी कोेणतीही परीस`थिती नाही.त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावु नये.उघड्यावरील अन्न खावू नये.सर्दी खोकला,जुलाब,उलट्या झाल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.घरी उपचार करु नये,असे आवाहन डाॅ.खाेमणे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीWaterपाणीwater pollutionजल प्रदूषण