बिर्याणी हाउसच्या आगीने घेतला चिमुरडीचा बळी; पुण्यातील सदाशिव पेठेतील घटना
By विवेक भुसे | Updated: October 22, 2022 13:06 IST2022-10-22T13:04:08+5:302022-10-22T13:06:54+5:30
अग्निशमन दलाचे वाहन १० वाजून ५७ मिनिटांनी घटनास्थळी पोहचले...

बिर्याणी हाउसच्या आगीने घेतला चिमुरडीचा बळी; पुण्यातील सदाशिव पेठेतील घटना
पुणे : सदाशिव पेठेतील एका बियार्णी हाऊसमध्ये लागलेल्या आगीत ६ वर्षाच्या मुलीचा भाजून मृत्यू झाला़. ही घटना आज (ता. २२) सकाळी ११ वाजता घडली़. इकरा नईम खान असे या मुलीचे नाव आहे.
याबाबत अग्निशामन दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील भिकारदास मारुतीजवळील एका बिर्याणी हाऊसमध्ये आज सकाळी आग लागली. आगीची माहिती अग्निशामक दलाला १० वाजून ५२ मिनिटांनी मिळाली. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाचे वाहन १० वाजून ५७ मिनिटांनी घटनास्थळी पोहचले.
जवानांनी घटनास्थळावरुन ३ सिलेंडर बाहेर काढले. तसेच आगीत अडकलेल्या ६ वर्षाच्या मुलीला बाहेर काढून देवदूत वाहनातून दवाखान्यात नेले. परंतु सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.