शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांचा विवाहित पुरूष, पुण्यात डेटिंग ॲपवरून २३ वर्षांच्या तरुणीला ओढलं जाळ्यात, कशी फसली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:49 IST

Dating App Scam: फोन नंबर एक्स्चेंज झाला, भेटीगाठी होऊ लागल्या. ५० वर्षाच्या व्यक्तीला २३ वर्षीय मिनल डेट करू लागली.

- शिवानी खोरगडेराष्ट्रीय खेळाडू असलेली आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मिनलने (काल्पनिक नाव) डेटिंग ॲप डाउनलोड केले. स्वत:च्या प्रोफाईलशी एक प्रोफाईल मॅच होतेय हे बघून मिनलनेही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. समोरच्याने अविवाहित असल्याचं सांगितलं अन् त्यांच्यात ऑनलाईन चॅटिंग सुरु जाली. फोन नंबर एक्स्चेंज झाला, भेटीगाठी होऊ लागल्या. ५० वर्षाच्या व्यक्तीला २३ वर्षीय मिनल डेट करू लागली. सारे काही झाल्यानंतर त्या व्यक्तीचा खरी माहिती मिलनला झाली आणि फसल्याची भावना होऊ लागली. 

या व्यक्तीने तिला लग्न करण्याचं आमिष दाखवून तिच्याशी बऱ्याच वेळा जबरदस्तीने  शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी तिला तो विवाहित असून त्याला दोन मुले असल्याचेही समजले. मिनलनं त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती काढून पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. तिथे तिला नकारात्मक वागणूक मिळाली. डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे. परंतू, या साऱ्या काळात तिला अशाप्रकारे अनेक मुलींची फसवणूक होते, आणि पोलिसात गेल्यावर या केसेस दाबल्या देखील जात असल्याचे धक्कादायक वास्तव तिला समजले. डिजिटल फ्रॉडच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जसजशा टेक्नॉलॉजी येत गेल्या तसतसे ऐकिवात नसलेलेही फसवणुकीचे प्रकार व्हायला लागले आहेत. ज्यात सध्या डेटिंग ॲपचा उपयोग करून होणारे फसवणुकीचे प्रकार सर्रास ऐकायला मिळतात. 

सायबर गुन्हे शाखेत किती गुन्हे दाखल आहेत.मॅट्रोमोनी फसवणूक - ६९ केसगिफ्ट आमिष - ९४ केसफोन कॉल फसवणूक - ३९१ केसगेल्यावर्षी एकोणवीस हजार केस दाखल आहेत. त्यापैकी २५ ते ३० टक्के केस या सोशल साईट्स वरून फसवणुकीच्या आहेत. डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीच्या प्रकारात आरोपी समोरच्याची संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न करतात. समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या जातात. त्यासाठी खरंखुरं भासेल अशी सोशल मीडियावर किंवा ॲपवर प्रोफाईल तयार केले जाते. समोरून तुम्हाला अप्रोच केला जातो. किंवा डेटिंग ॲपवर तुमची प्रोफाईल बघून स्वतःची प्रोफाईल आरोपी बनवतो. जेणेकरून तुम्हाला मिळत्या - जुळत्या प्रोफाईलचं सजेशन येईल. अशाप्रकारे तुम्हाला जाळ्यात ओढलं जातं. 

"डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर मैत्री किंवा प्रेम इथपर्यंत जाण्याअगोदर समोरच्याची पूर्ण माहिती मिळवली पाहिजे. समोरून सांगितल्या जात आहेत त्या गोष्टींवर थेट विश्वास ठेवणं धोकादायक आहे. आमच्याकडे बऱ्याच केस अशा झाल्या आहेत की समोरची व्यक्ती अविवाहित असल्याचं सांगते, पण ती व्यक्ती विवाहित असते. केवळ महिनोंमहिन्याच्या चॅटिंगवर करोडो रुपये दिल्याच्या घटना आमच्याकडे आलेल्या आहेत." - दगडू हाके, पो. नि. सायबर गुन्हे पुणे 

सोशल मीडियावरील ओळख पडतेय महागात - सोशल मीडियावरून महिला किंवा तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले जाते. त्यातून लैंगिक अत्याचार होतात. तसेच आर्थिक फसवणूक होण्याचेही प्रकार घडत आहेत. 

शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत दाखल गुन्हे : 

गुन्हे                 जुलै २०२२     जुलै २०२१ विवाहितेला क्रूर वागणूक देणे - २१९  - १६१ बलात्कार  -                    १७५  - १२८ विनयभंग  -                    २९५  - २०० अपहरण -                      ४०३  -  ३४४

डेटिंग ॲपवर खोट्या माहितीला बळी पडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कोणाशीही नवी ओळख करताना समोरच्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास न ठेवणे हाच एक बचावात्मक उपाय आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी