शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 17:20 IST

सद्यस्थितीत तरुणांना हृदयविकार होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे

पुणे : बदललेली जीवनशैली, वाढलेला ताणतणाव यामुळे हृदयविकार आणि त्यासंबंधीचे आजार वाढले आहेत. पूर्वी साधारण वयाच्या पन्नाशीनंतर हृदयविकार होत असे. परंतु, सद्यस्थितीत तरुणांना हृदयविकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अगदी ३० ते ४० वर्षांच्या तरुणांना हृदयविकार होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या २५ वर्षीय तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पूजा वसंत राठोड (वय २५, कोंडी तांडा, उत्तर सोलापूर), असे या तरुणीचे नाव आहे. 

 पूजा ही बहिणीसोबत पुण्यात राहत होती. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असतांना खासगी कंपनीमध्ये काम करत होती. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अभ्यासिकेमध्ये अभ्यास करीत असताना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी जवळ अभ्यास बसलेल्या विद्यार्थ्यांनी तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच दिवशी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ- बहिण, असा परिवार आहे.

काय म्हणतात हृदयरोग तज्ज्ञ 

सकस आहार हा आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचा विकार न होण्यास मदत होते. कडधान्ये, डाळी आणि चरबी कमी असलेले पदार्थ आदींचा आहारात समावेश करायला हवा, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.सतत एकाच जागी बसू नये. साधारणतः किमान अर्धा किंवा एक तासानंतर उठून चालावे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी उभे राहून काम करावे. एकाच जागी बसल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. एक मिनिटात किमान १०० पावले तरी चालावे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

काय काळजी घ्यावी

- नियमित व्यायाम करा.- संतुलित आहार घ्यावा.- नेहमी तणावमुक्त राहावे.- व्यसनांपासून दूर राहावे.- पुरेशी झोप घ्यावी.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीDeathमृत्यूexamपरीक्षाEducationशिक्षण