पुणे: पुण्याच्या ससूनमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. ससूनच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती कृष्णकुमार मीना ही मूळची राजस्थानची असून मुलींच्या वसतीगृहात राहत होती. तिने वसतिगृहातील खोलीतच गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ससूनमध्ये डॉक्टर तरुणीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. धक्कादायक घटनेने बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या तरुणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्महत्येचे कारण समजू न शकल्याने पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.