Pune Crime: तुला फिरायला नेतो म्हणत १५ वर्षीय मुलीवर दोघांचा बलात्कार
By नम्रता फडणीस | Updated: January 31, 2024 18:59 IST2024-01-31T18:58:35+5:302024-01-31T18:59:48+5:30
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली....

Pune Crime: तुला फिरायला नेतो म्हणत १५ वर्षीय मुलीवर दोघांचा बलात्कार
पुणे : तुला फिरायला नेतो असे सांगून मांजरी गावातील नवी पुलाच्या अलीकडील नदी पात्राच्या कडेने कच्च्या रोडच्या निर्जन भागात नेत अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली.
अनुराग साळवे (रा. आनंदनगर, मुंढवा), गणेश म्हेत्रे (रा. शिंदे वस्ती, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत १५ वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलगी तिची आई व सावत्र वडिलांबरोबर राहायला आहे. मुलीची मैत्रिणींच्या माध्यमातून आरोपी साळवे आणि म्हेत्रे यांच्याशी ओळख झाली होती. सोमवारी (दि. २९) दुपारी मुलगी घरी आली. सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी अनुराग मुलीच्या घरी आला. बहिणीचा वाढदिवस असल्याचे मुलीच्या वडिलांना सांगितले. मुलीला वाढदिवसासाठी पाठवा, असे त्याने सांगितले. वडिलांनी तिला वाढदिवसाला जाण्याची परवानगी दिली.
त्यानंतर मांजरी परिसरात आरोपी गणेश आणि त्याचा मित्र आयुष अनुरागला भेटले. मुलीला दुचाकीवर फिरायला नेण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेले. तेथे आरोपी अनुराग आणि गणेश यांनी मुलीला धमकावून बलात्कार केला. घाबरलेली मुलगी घरी पोहोचली. तिने कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.