शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये पैसे भरणाऱ्यांनीच लावला ९९ लाखांना चुना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 16:24 IST

बँक ऑफ महाराष्ट्र व आयसीआयसीआय बँकेच्या एकूण ११ एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये पैसे भरताना काहीच रक्कम मशीनमध्ये भरली़.

पुणे : एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी दिलेल्या दोघांनी (कस्टोडियन) कंपनीतून पैसे तर घेतले़. पण, त्यातील काहीच रक्कम एटीएम मशीनमध्ये भरुन उरलेली रक्कम हडप केली़. खडकी येथील सिक्युरिटी ट्रान्स इंडिया प्रा़. लि़ या कंपनीला दोघांनी तब्बल ९९ लाख ५६ हजार ६०० रुपयांना चुना लावून ते फरार झाले आहेत़. राकेश वसंत जोशी (वय ३४, रा़ हिरकणी सोसायटी, शिंदेनगर) आणि सुयश किशोर पवार (वय ३३, रा़ वाघोली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांचीन नावे आहेत़. याप्रकरणी सिक्युरिटी ट्रान्स इंडियाचे अधिकारी शैलेश डाहाके (वय ३४, रा़. वारजे) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, सिक्युरिटी ट्रान्स इंडिया या कंपनीकडे वेगवेगळ्या बँकांमधील एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये रोख रक्कम जमा करण्याचे काम देण्यात आले आहे़. कंपनीकडे हे काम करणारे २२ कस्टोडियन आहेत़. एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी त्यांनी त्यांना रुट ठरवून दिले आहेत़. त्यानुसार राकेश जोशी आणि सुयश पवार यांच्याकडे क्रमांक १० चा रुट दिलेला होता़. यामध्ये दौंड, यवत, थेऊर व त्या परिसरातील १३ एटीएम मशीनमध्ये त्यांना पैसे भरण्यासाठी रक्कम दिली जात असे़. या दोघांनी क्रमांक १० च्या मार्गावरील १३ मशीनपैकी बँक ऑफ महाराष्ट्र व आयसीआयसीआय बँकेच्या एकूण ११ एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये पैसे भरताना काहीच रक्कम मशीनमध्ये भरली़. मात्र, आपल्या अकाऊंटमध्ये नोंद करताना सर्व रक्कम भरल्याची नोंद केली़. असा प्रकार अनेक दिवस केल्यानंतर ४ ऑक्टोंबर २०१९ पासून ते दोघेही अचानक कामावर येणे बंद झाले़. त्यांचा काहीही पत्ता लागत नव्हता़. त्यामुळे कंपनीला संशय आल्याने कंपनीने त्यांनी भरलेले एटीएममध्ये भरलेले पैसे व अकाऊंटमध्ये दाखविलेले पैसे याचे ऑडिट केले़. त्यात त्यांनी एटीएम मशीनमध्ये दिलेले पूर्ण पैसे न भरता ९९ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा अपहार केल्याचे दिसून आले़. त्यानंतर कंपनीच्या वतीने खडकी पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे़. पोलीस निरीक्षक शफिल पठाण अधिक तपास करीत आहेत़.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसatmएटीएम