शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

यवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 7:42 PM

यंदाचे साहित्य संमेलन हे विदर्भातच होणार हे जवळपास निश्चित झाले होते. केवळ स्थळावर अद्याप निर्णय झालेला नव्हता.

ठळक मुद्देस्थळ निवड समितीची यवतमाळला भेट देऊन स्थळ व सर्व संबंधित आणि आनुषंगिक बाबींची पाहणीविदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा आणि डॉ. वि.भ कोलते संशोधन केंद्र व वाचनालय यांच्या वतीने हे संमेलन आयोजन

पुणे : ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळला होणार आहे यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने अखेर मंगळावारी  शिक्कामोर्तब केले. स्थळासंदभार्तील अधिकृत घोषणा महामंडळाकडून करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा आणि डॉ. वि.भ कोलते संशोधन केंद्र व वाचनालय यांच्या वतीने हे संमेलन आयोजित केले जाणार आहे. यंदाचे साहित्य संमेलन हे विदर्भातच होणार हे जवळपास निश्चित झाले होते. केवळ स्थळावर अद्याप निर्णय झालेला नव्हता. ९२ व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा आणि डॉ. वि.भ कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या निमंत्रक संस्थांनी प्रस्ताव दिला होता. महामंडळाच्या संमेलन स्थळ निवड समितीने यवतमाळला भेट देऊन स्थळ व सर्व संबंधित आणि आनुषंगिक बाबींची पाहणी केली. त्यानंतर संमेलन स्थळ निवड समितीच्या बैठकीत या समितीने सवार्नुमते यवतमाळ च्या संमेलन स्थळाची शिफारस महामंडळाला केली होती. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, उपाध्यक्ष डॉ. विद्या देवधर, कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके, कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे या पदाधिका-यांसह मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रतिनिधी डॉ. दादा गोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे विनोद कुळकर्णी आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिनिधी डॉ. अनुपमा उजागरे यांचा या समितीत समावेश आहे. महामंडळाच्या सर्व सदस्यांच्या सहमतीनंतर महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी महामंडळाचा निर्णय मंगळवारी जाहीर केला.साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन तसेच संमेलनाचा सविस्तर कार्यक्रम ठरविण्यासाठी महामंडळाच्या ग्रंथ प्रदर्शन समितीची २६ आॅक्टोबरला, संमेलन मार्गदर्शन समितीची २७ आॅक्टोबर आणि महामंडळाची सभा २८ आॅक्टोबरला यवतमाळ येथे आयोजित करण्यात आल्या असल्याचे महामंडळाने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेYavatmalयवतमाळmarathiमराठी