कॅन्टोन्मेंटसाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल
By Admin | Updated: December 12, 2014 00:06 IST2014-12-12T00:06:33+5:302014-12-12T00:06:33+5:30
62 अपक्ष उमेदवारांसह काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 29 अधिकृत उमेदवारांनी आपले अर्ज आज दाखल केले.

कॅन्टोन्मेंटसाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल
पुणो : 62 अपक्ष उमेदवारांसह काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 29 अधिकृत उमेदवारांनी आपले अर्ज आज दाखल केले. शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज भरल्याने युती संपुष्टात आली असून, 15 डिसेंबर रोजी होणा:या माघारीनंतर पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 8 वॉर्डामध्ये रिंगणात असलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
अर्ज भरण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी 264 अर्ज दाखल झाल्याने एकूण अर्जाची संख्या 364 झाली. अर्ज बाद होऊ नये यासाठी प्रत्येक उमेदवाराने प्रत्येकी 4 अर्ज भरल्याने अर्जाची संख्या वाढली. एकूण 91 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
वॉर्ड क्रमांक 1 मधून 6, क्रमांक 2 मधून 15, 3 मधून 16 जणांनी अर्ज दाखल केले. तर वॉर्ड क्रमांक 4 मधून 11, 5 मधून 1क् तसेच 6 मधून 6 जणांनी अर्ज दाखल केले असून, क्रमांक 7 मधून 13 आणि 8 मधून 14 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
सेना-भाजप युती तुटल्याचे स्पष्ट
शिवसेनेने वॉर्ड क्रमांक 1, 4 आणि 6 मधून उमेदवार दिलेले नाहीत. भाजपने 5 जागा लढविण्याची मागणी करून रिपब्लिकन पक्षासाठी 1 जागा मागितल्याने शिवसेनेने जागावाटपाची चर्चाच करण्याचे नाकारले. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत आमनेसामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी सदस्य प्रसाद केदारी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी न घेता अपक्ष अर्ज भरला असून, याच पक्षाचे माजी सदस्य शैलेश बिडकर यांच्या प}ीने अपक्ष अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कवडे यांनी काँग्रेसतर्फे अर्ज भरला आहे.
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षांच्या उमेदवारांची वॉर्ड 1 ते 8 निहाय अनुक्रमे नावे अशी - 1) नौशाद शानी / अनिता सोनटे /लक्ष्मी मोरे/- 2)अशोक पवार /प्रवीण जाधव / रे पास्कल फर्नाडिस/ अतुल गोंदकर 3) अजिम गुडाकूवाला/ दिलीप गिरमकर/ महंमद चौधरी / मनीष सोनिग्रा 4) करणसिंग मकवानी/ अतुल गायकवाड/ रणजित परदेशी / - 5) आरती महाजन /विवेक यादव/ पोपट गायकवाड/ विकी पिल्ले 6) विनोद मथुरावाला / सचिन मथुरावाला/राघवाचारी जयकुमार /- 7) सुरेखा संजय कवडे/किरण मंत्री/सीमा संतोष कवडे / ममता परदेशी 8) साबिरा मंजूर शेख/ प्रियंका श्रीगिरी/यास्मिन कुरेशी/रोहिणी कोल्हाळकर. (प्रतिनिधी)
15 तारखेला सकाळी 1क् ते 4 र्पयत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत असून 19 तारखेला चिन्ह वाटप असून, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. आज सायंकाळी 6 नंतर छाननीचे काम सुरू झाले. रात्री उशीरार्पयत ते सुरू होते.