शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोसाठी लागणार ९ हजार टनांचे रूळ : स्वित्झर्लंडमध्ये उत्पादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 08:00 IST

मेट्रोसाठी वापरण्यात येणारे हे रूळ हेड हार्डन या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञानाने बनवण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१२० टनांचे रूळ लागणार असून एकूण ९ हजार टन रूळ संपुर्ण मेट्रो मार्गासाठी लागणार पुण्यात आले ६०० टन रूळ 

पुणे : मेट्रो मार्गावर लवकरच रूळ बसवण्यााच्या कामास सुरूवात करण्यात येणार आहे. एका किलोमीटरच्या मार्गाला १२० टनांचे रूळ लागणार असून एकूण ९ हजार टन रूळ संपुर्ण मेट्रो मार्गासाठी लागणार आहेत. नवे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेले हे रूळ स्वित्झर्लंडमधील एका कंपनीने त्यांच्या सैबेरियामधील कारखान्यात उत्पादित केले आहेत. मेट्रोसाठी वापरण्यात येणारे हे रूळ हेड हार्डन या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञानाने बनवण्यात आले आहे. जगभरात याच प्रकारचे रूळ वापरण्यात येतात. १८ मीटर व २५ मीटर अशा दोन प्रकारच्या लांबीत हे रूळ आहेत. ते फ्लॅश बट व अ‍ॅल्युमिना थर्मल वेल्डिेंग या तंत्रज्ञानाने जोडले जातील. त्यानंतर त्याचे अत्याधुनिक अल्ट्रा सॉनिक यंत्राद्वारे तपासले जातील. रूळांचा वरचा भाग विशेष तंत्रज्ञानाद्वारे कठीण करण्यात आलेला आहे. रूळ बसवण्यासाठीही जगात सर्वत्र वापरले जाणारे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.  रेल्वे रूळ त्याच्या खालील बाजूस दगडांच्या खडीचा थर देऊन नंतर त्यावर टाकले जातात. त्यामुळे रुळांवरून रेल्वे जाताना रुळ खाली दबले जातात व कुशन सारखा परिणाम साधला जातो. प्रवाशांनाही त्याचा अनुभव येतो. मात्र मेट्रो च्या या रुळांच्या खाली खडी न टाकता नवे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी तर वाटेलच शिवाय या तंत्रज्ञानामुळे कमीत कमी देखभाल दुरूस्तीची गरज पडते.  उन्नत  व भुयारी अशा दोन्ही मार्गांवरील रुळांना हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा मेट्रोचा एकूण ३१.५ किलोमीटरचा मार्ग आहे. यातील कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मार्ग भूयारी आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी-चिंचवड ते बोपोडी या मार्गावर प्राधान्याने हे रूळ बसवण्यात येतील. डिसेंबर २०१९ अखेर हे दोन्ही मार्ग सुरू करण्याचे उद्दीष्ट महामेट्रो कंपनीने ठेवले आहे. त्यानुसार या मार्गावरील सर्व खांबांचे व त्यावरील कॅप्सचे काम पुर्ण होत आले आहे.  त्यामुळे रूळ टाकण्याच्या कामास सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोSwitzerlandस्वित्झर्लंड