शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: ललित पाटील पलायन प्रकरणात एका अधिकाऱ्यासह ९ पोलिस निलंबित

By विवेक भुसे | Updated: October 3, 2023 20:17 IST

एका अधिकाऱ्यासह ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले...

पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्ज रॅकेट चालविणारा आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या ललित पाटील प्रकरणी एका अधिकाऱ्यासह ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ललित पाटील ड्रग्ज विक्री प्रकरणात ४ कर्मचारी तर पाटील याने ससूनमधून पलायन केल्या प्रकरणी महिला अधिकाऱ्यासह ५ जणांना निलंबित करण्यात आले आहे. सहायक फौजदार जर्नादन काळे, पोलिस कर्मचारी विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे आणि दिगंबर चंदनशिव अशी ड्रग्ज रॅकेट प्रकरणात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, पोलिस नाईक नाथाराम काळे, पिरप्पा बनसोडे आणि अमित जाधव अशी ललित पाटील पलायन प्रकरणात निलंबित केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले आहेत.

ससून रुग्णालयात ड्रग्ज आल्या प्रकरणात चौघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. ससून रुग्णालयात आलेल्यांकडील संशयास्पद वस्तू तपासण्याची जबाबदारी या चौघांकडे होती. तरीही ससून रुग्णालयात ड्रग्ज आणले गेले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चौघांना निलंबित करण्यात आले आहे.

ललित पाटील हा ड्रग्ज माफिया आहे. त्याच्या बंदोबस्तासाठी कोर्ट पार्टी नियुक्त करण्यात आली होती. दोन दिवसापूर्वीच ससून रुग्णालयात २ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले होते. त्यात ललित पाटील हा मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले होते. त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल आढळून आले होते. त्याच्याकडे चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेने ससून रुग्णालय व कारागृहाकडे पत्र दिले होते. असा महत्वाच्या आरोपीच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे व इतरांची नेमणुक करण्यात आली होती. असे असताना ललित पाटील या एक्सरे काढण्यासाठी तळमजल्यावर आणण्यात येत असताना ललित पाटील हा पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळून गेला. बंदोबस्तावर नेमण्यात आलेल्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने पोलिस दलाची बदनामी झाल्याने पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसsuspensionनिलंबनPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी