८७ पथके..
By Admin | Updated: July 8, 2015 01:44 IST2015-07-08T01:44:58+5:302015-07-08T01:44:58+5:30
प्रत्येक दिंडी प्रमुखास एक औषध किट देण्यात येणार आहे. त्यात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, यावरची औैषधं असणार आहेत.

८७ पथके..
प्रत्येक दिंडी प्रमुखास एक औषध किट देण्यात येणार आहे. त्यात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, यावरची औैषधं असणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून आरोग्य विभागाची तयारी सुरू असून, त्यांना आराखडा तयार केला आहे. पालखी मार्गावरील सर्व पाणीस्रोतांची जैविक तपासणी करण्यात आली आहे. दूषित आलेल्या स्रोतांचे पुन्हा शद्धीकरण करून ते पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पुन्हा नमुना दूषित आलेल्या ठिकाणी ‘हे पाणी पिण्यास अयोग्य आहे,’ असा फलक लावण्यात आलेला आहे. पालखी मार्गक्रमण मार्गावर काळात एक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला आहे. टँकर भरण्याची ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत. पालखी येण्याअगोदर मुक्कामाच्या ठिकाणी दोन दिवस अगोदर धूरफवारणी व कीटकशास्त्रीय सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. गेल्या वर्षी आरोग्य विभागातर्फे १ लाख ३२, २४३ वारकऱ्यांना सेवा देण्यात आली होती. (प्रतिनिधी)