शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

करावं तेवढं कौतुक कमीच!आजीबाईंच्या बटव्यामधून कोरोनाविरुद्धच्या संघर्षासाठी १ लाख १ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 17:42 IST

रामनवमी उत्सवाला फाटा देत वर्षभराच्या पेन्शनमधून जमा होणारे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

ठळक मुद्देसोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या अनेक वर्षे कसबा पेठेत श्रीरामनवमी उत्सव करतात साजरा

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे मोठे संकट महाराष्ट्रासमोर उभे राहिले आहे. त्यातून मार्ग काढत शासनासोबत लढा देण्याकरीता पुण्यातील आजींनी पुढाकार घेतला. वर्षभराच्या पेन्शनमधून जमा होणारे पैसे श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी व सामाजिक संस्थांना सन्मानित करण्यासाठी त्या गेल्या २५ वर्षे वापरत होत्या. मात्र, यंदा हे १ लाख १ हजार रुपये त्यांनी कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढयाला दिले आहेत. 

पार्वती चव्हाण असे या आजींचे नाव होय. स्वत:च्या सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या अनेक वर्षे कसबा पेठेत श्रीरामनवमी उत्सव साजरा करत होत्या. श्रीरामनवमीनिमित्त महाभंडारा देखील केला जात असे. शेकडो भक्त या महाप्रसादाचा लाभ घेत. मात्र, ही परंपरा यंदा खंडित झाली तरीही कोरोनाविरुद्धच्या लढयाला त्यांनी ही मदत दिली आहे. 

पार्वती चव्हाण १९९४ साली पुणे मनपा शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या. त्यावेळी त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देखील मिळाला होता. त्या आता ८५ वर्षाच्या असून गेली २५ वर्षे स्वत:ला मिळणाऱ्या पेन्शनमधून रामनवमी उत्सव साजरा करतात. त्या म्हणाल्या की, दरवर्षी कसबा पेठेतल्या फडके हौदापाशी साजऱ्या  होणाऱ्या  उत्सवाला पाचशेपेक्षा जास्त भाविक येतात. त्यांची महाप्रसादाची सोय मी करीत असते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात. यंदा ही परंपरा दूर ठेवत मी ही मदत दिली आहे. प्रभु रामाने जसे लंकेमध्ये जाण्याकरीता सेतू बांधला, त्यामध्ये अनेकांनी खारीचा वाटा उचलला. तसेच मी देखील या लढयामध्ये खारीचा वाटा देत आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChief Ministerमुख्यमंत्रीfundsनिधी