शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 19:33 IST

पुण्यात भीतीच वातावरण तयार झालं होत, मात्र आता गुन्हेगारी कमी झाली आहे

पुणे : पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस आयुक्तालय येथे झालेल्या बैठकीत दिली आहे. पुण्यातील पहिल्या भेटीत गृहराज्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. तसेच त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक घेत शहरातली कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कदम म्हणाले, पुणे आयुक्तालयाच्या मी आज आढावा घेतला. 100 दिवसाच्या प्लॅनची अंमलबजावणी कशी केली जात आहे, याचा आढावा घेतला. पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यात आज माझा पहिला दौरा आहे. पुणे पोलीस प्रशासनाला शासनाकडून काही अपेक्षा आहेत. दरवेळेला आम्ही सूचना करत असतो. परंतु, पोलीस कमिशनर असतील त्यांची सर्व टीम असेल त्यांना प्रशासनाकडून शासनाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, त्यांना काय हवं आहे, यावर सुद्धा विचारणा केली आहे, अशी माहिती कदम यांनी दिली. 

जिथ चुका होतील तिथं करवाई होणार

पुण्यात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. आता कोयता गँग अशी काही अस्तित्वात नाही. 2023 पेक्षा 24 मध्ये गुन्हेगारी 50 टक्के कमी झालीये.  ड्रग्स विक्रीवर कडक कारवाई झाली पाहिजे. काही गोष्टी घडल्या असतील अणि दादांनी त्यावर बोललं असेल तर त्यात काही गैर नाही. अजितदादांनी ज्या सुचना दिल्या आहेत, त्या प्रशासनाने पाळल्या पाहिजेत. यात दादांचं सुद्धा मार्गदर्शन घेवू. जिथ चुका होतील तिथं करवाई केलीच पाहिजे. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांच आणि मुलांचं समुपदेशन करू तशा सूचना दिल्या आहेत.

2023 च्या तुलनेत क्राईम रेट शहरात कमी झाला

 2023 च्या तुलनेत क्राईम रेट शहरात कमी झाला आहे. अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, यावर देखील अनेक सुधारणा करणार आहोत. सायबर क्राईममध्ये देखील वाढ झाली आहे. याबाबत स्टाफ वाढवण्याचा सूचना दिल्या आहेत. मुंबई मध्ये संयुक्त इमारत सायबरसाठी आहे, तशीच पुण्यात देखील हवी अशी मागणी करण्यात येणार आहे आणि ती पुर्ण देखील केली जाईल, पोलीस पोलिस प्रशासन आणि मुख्यमंत्री यांच्या मधला मी दुवा आहे, असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.  

पोलिसांना फ्री हॅन्ड देणार 

4000 कोटीच ड्रग्स पकडलं होत त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन केलं. ग्राउंड लेवलवर ड्रग्सवरती लक्ष ठेवले पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. 229 कारवाई ड्रग्स प्रकरणी केली आहे, यात कारवाया वाढवा. ड्रग्समध्ये काम करताना पोलिसांना फ्री हॅंड आम्ही देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

टॅग्स :PuneपुणेYogesh Kadamयोगेश कदमPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcommissionerआयुक्त