शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ससूनवर देणगीदारांची ‘माया’ तीन वर्षांत ८५ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 14:18 IST

राज्यात सध्या विविध प्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अतिदक्षता कक्ष, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा यांमध्ये ससून रुग्णालयाचे स्थान वरचे आहे.

ठळक मुद्देतंत्रज्ञान व उपचार पद्धतींना आत्मसात करून रुग्णालयाने शासकीय रुग्णालयांमध्ये ठसा  गोरगरिबांसह मध्यमर्गीय रुग्णही उपचारांसाठी ससूनला पसंती

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी वरदान असलेल्या ससून रुग्णालयाला खासगी कंपन्या तसेच सामाजिक संस्थांकडून मागील तीन वर्षांत ८५ कोटी रुपये देणगीस्वरूपात मिळाले आहेत. देणगीदारांची ही ‘माया’ ससून रुग्णालयाचा कायापालट करत असल्याने रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. राज्यात सध्या विविध प्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अतिदक्षता कक्ष, रुग्णांना मिळणाऱ्या विविध सुविधा, यांमध्ये ससून रुग्णालयाचे स्थान वरचे आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येचे आव्हान पेलत बदलते तंत्रज्ञान व उपचार पद्धतींना आत्मसात करून रुग्णालयाने शासकीय रुग्णालयांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या निधीबरोबरच खासगी कंपन्या व सामाजिक संस्थांकडून देणगी स्वरूपात दिल्या जाणाऱ्या निधीमुळे हे शक्य झाले आहे. देणगीस्वरूपातील निधीच्या माध्यमातून अत्याधुनिक अन्नपूर्णा भवन, प्रत्येक वॉर्डात ई.सी.जी. मशीन, सर्व वॉर्डांचे नूतनीकरण, आय.सी.यू.चे नूतनीकरण, ५९ बेडच्या नवजात अतिदक्षता कक्षाची उभारणी, पचनसंस्थेच्या आजारांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक कक्ष, कॅथलॅबचे नूतनीकरण,व्हेंटिलेटर,डिफेबीलेटर,लेझर मशीन, आॅपरेशन थिएटरमधील विविध यंत्रसामग्री, फॉगर मशीन यांसह विविध वैद्यकीय उपकरणे देणगीस्वरूपात मिळाली आहेत. तसेच रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांसाठीही विविध पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयामध्ये अनेक बदल होत असून, गोरगरिबांसह मध्यमर्गीय रुग्णही उपचारांसाठी ससूनला पसंती देऊ लागले आहेत. 

टॅग्स :sasoon hospitalससून हॉस्पिटलPuneपुणेhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य