पुणे मेट्रोसाठी ८० कोटींची तरतूद, नगरविकास विभागाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 03:43 IST2017-10-13T03:28:51+5:302017-10-13T03:43:49+5:30
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाचा वाटा म्हणून ८० कोटी रुपये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.ला देण्यात आले आहेत.

पुणे मेट्रोसाठी ८० कोटींची तरतूद, नगरविकास विभागाचा आदेश
मुंबई : पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाचा वाटा म्हणून ८० कोटी रुपये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.ला देण्यात आले आहेत. नगरविकास विभागाने आज या बाबतचा आदेश काढला. शासनाने या आधी १० कोटी रुपये दिले होते. या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा एकूण हिस्सा १ हजार ३१० कोटींचा असेल.