शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

खेळताना खांबाला स्पर्श; विजेच्या धक्क्याने ८ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:16 IST

आणखी एक मुलाचा खांबाला स्पर्श झाला, एका बसचालकाने तत्परता दाखवून दोघांना लाकडी बांबूने ढकलले, परंतु मुलीचा मृत्यू झाला

पुणे : खेळत असताना विजेच्या धक्क्याने आठ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. ही घटना नाना पेठेत रविवारी घडली. या दुर्घटनेत आणखी एक मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. सायली डंबे (वय ८, रा. डोके तालीमजवळ, नाना पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. 

सायली डंबे आणि मुले रविवारी दुपारी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात खेळत होते. त्यावेळी इनामदार चौकातील एका खांबाला सायलीचा स्पर्श झाला. या खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. सायली आणि तिच्याबरोबर असलेला एक मुलाला विजेचा धक्का बसला. हा प्रकार तेथून निघालेल्या एका बसचालकाने पाहिला. त्याने तत्परता दाखवून दोघांना लाकडी बांबूने ढकलले, अशी माहिती या भागातील नागरिकांनी दिली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल उपचार करण्यात आले. उपचारांदरम्यान सायलीचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर नाना पेठ परिसरात शोककळा पसरली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे.

शाळकरी मुलीचा विजेचा धक्क्याने मृ्त्यूप्रकरणी महावितरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली. याबाबतचा अहवाल ‘महावितरण’कडून आल्यानंतर चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसmahavitaranमहावितरणelectricityवीजDeathमृत्यूSchoolशाळा