शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय? ‘पीएमपीएल’ संपवायचीच आहे का? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 19:21 IST

बदल्यांच्या खेळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गरीब प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय

पुणे: कोणत्याही मोठ्या शहरातील सार्वजनिक वाहतूक ही तेथील गरीब प्रवाशांसाठी जीवनवाहिनी असते. पुणे शहराची अशीच जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) कंपनीच्या अध्यक्षपदी ७ वर्षात ८ वेळा बदल करून सरकार पुणेकर गरीब प्रवाशांची चेष्टा करत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

‘पीएमपीएल’च्या अध्यक्षपदी सरकारने नुकतीच नवी नियुक्ती केली. त्यावरून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, दीपा मुधोळ-मुंडे यांना वर्षभरच काम करण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत त्यांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेत चांगले बदल केले. सरकारने एका वर्षातच त्यांची बदली केली व पंकज देवरे यांची नियुक्ती केली.

मागील ७ वर्षांत नयना मुंडे, डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. कुणाल खेमणार, लक्ष्मीनारायण मिश्रा, ओमप्रकाश बकोरिया, सचिंद्र प्रताप सिंह, डॉ. संजय कोलते असे ७ चांगले प्रशासकीय अधिकारी त्यांचा सेवाकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच बदलण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे १० लाख प्रवासी दररोज ‘पीएमपी’ने प्रवास करतात. या प्रवाशांना सुलभ सेवा मिळणे गरजेचे आहे. मात्र, सरकारला ते महत्त्वाचे वाटत नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्यांना त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे ठेकेदारांशी गुंतलेले हितसंबंध कारणीभूत आहेत, असा आरोप जोशी यांनी केला. त्यांच्या या खेळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गरीब प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो आहे. ही कंपनी बंद पडावी व खासगी कंपन्यांना संधी मिळावी, असाच डाव यामागे असल्याची टीका जोशी यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीPresidentराष्ट्राध्यक्षticketतिकिटSocialसामाजिक