शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

विमानात सापडली ८ सोन्याची बिस्किटे!; सीमा शुल्क विभागाची दक्षता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 3:19 PM

दुबईहून आलेल्या विमानातील एक प्रवाशाच्या सीटखालील लाईफ जॅकेटमध्ये २९ लाख रुपये किंमतीची ८ सोन्याची बिस्किटे सापडली असून ती तस्करी करुन आणण्यात आली होती़

ठळक मुद्देआयातीवरील कर वाढविल्यामुळे दुबईहून सोने तस्करी करुन भारतात आणण्याच्या प्रमाणात वाढ या बिस्किटावर कोणी दावा केला नाही़, त्यामुळे ते बेनामी म्हणून जप्त करण्यात आले आहे़

पुणे : दुबईहून आलेल्या विमानातील एक प्रवाशाच्या सीटखालील लाईफ जॅकेटमध्ये २९ लाख रुपये किंमतीची ८ सोन्याची बिस्किटे सापडली असून ती तस्करी करुन आणण्यात आली होती़ सीमा शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.आयातीवरील कर वाढविल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दुबईहून सोने तस्करी करुन भारतात आणण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे़ पुणे, पणजी, कोईमतूर अशा वेगवेगळ्या विमानतळावर तस्करी करुन आणलेले सोने पडण्यात सीमा शुल्क विभागाला यश आले आहे़ दुबईहून शनिवारी आलेल्या जेट विमानाची तपासणी करीत असताना सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना २७ एफ या सीटच्या लाईफ जॅकेटमध्ये काळ्या सेलोटेपमध्ये गुंडाळून ठेवलेली ही ८ बिस्किटे आढळून आली़ त्यांचे वजन ९३३़११ ग्रॅम असून बाजारभावानुसार त्यांची किंमत २९ लाख १ हजार १७२ रुपये इतकी आहे़ यापूर्वी १८ आॅगस्ट २०१७ रोजी दुबईहून आलेल्या चौघांकडून १ कोटी ३८ लाख रुपयांचे ४ किलो ६८७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते़ ९ आॅगस्टला पुण्याहून दुबईला १ कोटी ३० लाख रुपये किंमतीचे युरो व डॉलर घेऊन जाणार्‍या दोघांना पकडण्यात आले होते़ २६ आॅक्टोंबर रोजी एका प्रवाशाकडून ४४४ ग्रॅम सोन्याचे दागिने पकडण्यात आले होते़ २१ आॅगस्टला अबुदाबीहून तस्करी करुन आणलेले १ कोटी ६३ ग्रॅम सोने पुणे विमानतळावर पकडण्यात आले होते़ याबाबत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले की, दुबई, अबुदाबी येथून येणारी विमाने ही तस्करीच्या बाबतीत संवेदनशील असतात़ त्यामुळे या विमानांची संपूर्ण तपासणी सीमा शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत असतात़ शनिवारी सकाळी दुबईहून आलेले आंतरराष्ट्रीय विमान पुण्यात उतरले़ ही फ्लाईट इंटरनॅशनल असली तरी पुण्याहून हे विमान नंतर डोमेस्टिक होऊन बंगलुरुला रवाना होणार होते़ त्यामुळे अशा विमानांची फार कसून तपासणी होते़ आज ही तपासणी करीत असताना २७ एफ सीटच्या खालीच असलेल्या लाईफ जॅकेटमध्ये काळ्या सेलो टेपमध्ये गुंडाळलेली ८ बिस्किटे आढळून आली़ त्यावर कोणी दावा केला नाही़ त्यामुळे ते बेनामी म्हणून जप्त करण्यात आले आहे़.

 

तस्करीचा नवा फंडादुबई-पुणे हे आंतरराष्ट्रीय विमान असल्याने पुण्यात सर्व प्रवाशांची कस्टम तपासणी होते़ परंतु, पुण्यातून हे विमान डोमेस्टिक होऊन बंगलुरुला जात असल्याने तेथे कस्टम तपासणी होण्याची शक्यता नसते़ त्यामुळे तस्कर अशाप्रकारे वेगवेगळे मार्ग हाताळताना दिसत आहेत़ दुबईला एक जण सोने घेऊन विमानात येतो़ तो पुण्यापर्यंत येतो़ सोने विमानातच लपवून ठेवतो़ पुण्यातून दुसरा साथीदार बंगलुरुला जातो़ उतरताना लपविलेले सोने घेऊन बाहेर निघून जातो, अशी नवी मोडस तस्कर अवलंबू लागले आहेत़ पण, सीमा शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे तस्करीचा प्रयत्न हाणून पडण्यात यश आले आहे़ 

टॅग्स :AirportविमानतळGoldसोनंPuneपुणे