२९ लाखांची सोन्याची बिस्किटे विमानतळावर जप्त

By admin | Published: January 12, 2017 04:26 AM2017-01-12T04:26:49+5:302017-01-12T04:26:49+5:30

मुंबईत विमानातून २९ लाख किमतीची सोन्याची बिस्किटे कस्टम विभागाने

29 lakh gold biscuits seized at the airport | २९ लाखांची सोन्याची बिस्किटे विमानतळावर जप्त

२९ लाखांची सोन्याची बिस्किटे विमानतळावर जप्त

Next

मुंबई : रियाधहून मुंबई विमानतळावर आलेल्या जेट एअरवेजच्या विमानातून २९ लाख किमतीची सोन्याची बिस्किटे कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत हस्तगत करण्यात आली आहे. बिस्किटांप्रकरणी मोहम्मद अल्ताफ मोईदिनला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
मोईदिन हा भारतीय नागरिक आहे. सौदी अरेबियातील रियाधहून आलेले जेट एअरवेजचे विमान मुंबई विमानतळावर उतरले. मुंबईमार्गे हे विमान मंगळुरूला जाणार
होते. त्यापूर्वी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत मोहम्मदकडे ११६० ग्रॅम वजनाची  दहा सोन्याची बिस्किटे आढळून आली.
दहा सोन्याच्या बिस्किटांची किंमत २९ लाख ६८ हजार ५८५ रुपये असल्याची माहिती आहे. त्याने एलईडी लाइटमध्ये ४ सोन्याची बिस्किटे लपवून ठेवली होती.  अन्य बिस्किटांना काळी पट्टी चिकटविण्यात आली होती. यामागील मुुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. तो ही बिस्किटे कोणाला व किती रुपयांमध्ये देणार होता. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती कस्टम विभागाने दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 29 lakh gold biscuits seized at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.