शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पावसानंतर कुकडीत ७.७६ टक्केच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 02:52 IST

जुन्नर तालुक्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस होऊनदेखील त्याचा लाभ धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेला नाही. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये ७.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

नारायणगाव - जुन्नर तालुक्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस होऊनदेखील त्याचा लाभ धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेला नाही. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये ७.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रथमच या धरणांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्र्षीच्या तुलनेत ५.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.जुन्नर तालुक्यात १ जूनपासून अनेक वेळा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सर्व धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पाणी येईल, असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचे पाणी आलेले नाही. जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज आणि आंबेगाव तालुक्यातील डिंभा या चार धरणांमध्ये २०३४ दलघफु (७.७६ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजअखेर अवघे ७३५ दलघफु (२.४१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. प्रथमच जूनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. सध्या येडगाव धरणात ९१९ दलघफु (३३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणात पिंपळगाव जोगातील मृतसाठा असलेले पाणी १२०० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. तसेच डिंभा डावा कालव्याद्वारे ६०० क्युसेक्स वेगाने येडगाव धरणात विसर्ग सुरू आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून ७५ मिमी पाऊस झालेला आहे. माणिकडोह धरणात ५१७ दलघफु (०.५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ११ मिमी पाऊस झालेला आहे. वडज धरणात ११३ दलघफु (९.६४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून ७३ मिमी पाऊस झालेला आहे.डिंभा धरणात ७९५ दलघफु (६.३६ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून७९ मिमी पाऊस झालेला आहे.पिंपळगाव जोगा धरणात उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसून या धरणातून १२०० क्युसेक्स वेगाने येडगाव धरणात विसर्ग सुरू आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर व शाखा अभियंताघळगे यांनी दिली.

टॅग्स :WaterपाणीDamधरणPuneपुणे