शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि १४६ गण निश्चित, नवीन गट रचनेत ५ तालुक्यात एका गटाची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:30 IST

पुण्याची लोकसंख्या नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने गटाची दोन व गणांची संख्या चारने कमी

पुणे: राज्य शासनाने पुणेजिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी यापूर्वी २०२२ मध्ये निश्चित केलेली गट- गण रचना अंतिम केली असून, त्यासंदर्भातील अध्यादेश जाहीर केला आहे. या नवीन गट, गण रचनेनुसार आता पुणे जिल्हा परिषदेचे ७३ गट व १४६ गण निश्चित केले आहेत. दरम्यान, पुणे महापालिकेमध्ये हवेली व मुळशीतील २३ गावे समाविष्ट झाल्याने हवेली तालुक्यातील गटांची संख्या सातने कमी झाली असून, नवीन गट रचनेत जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटाची वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आणि कटक मंडळी वगळता ग्रामीण क्षेत्रामध्ये ३३ लाख ८८ हजार ५१३ ग्रामीण क्षेत्रात लोकसंख्या आहे. जिल्हा प्रशासनाने २०११ च्या जनगनणेप्रमाणे ही आकडेवारी शासनाकडे सादर केली होती. राज्य शासनाने जिल्हा परिषद गट आणि गण यांची संख्या २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे म्हणजेच पाच वर्षांचा कार्यकाळ संपला त्यावेळचा २०२२ च्या वेळी जी संख्या होती ती गटांची संख्या कायम ठेवली आहे. संपूर्ण राज्यासाठी जिल्हा परिषदांमध्ये जास्तीत जास्त ७५ आाणि कमीत कमी ५० गट असतील, तर त्या प्रत्येक गटामध्ये दोन पंचायत समितीचे गण असणार असल्याचे सांगण्यात आले होते.

रचनेत मोठे फेरबदल होणार

नव्याने कोणत्या तालुक्यात गट-गण वाढवता येतील याबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवीन नियमानुसार तालुकानिहाय ७३ गट व १४६ गणांची संख्या निश्चित केली आहे. यामध्ये लोकसंख्येची सरासरी काढून हे गट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात गट संख्येत वाढ झाली आहे. या तालुक्यात गट-गणांच्या रचनेत मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट झाले.

अडीच लाख लोकसंख्या घटली

ग्रामीण क्षेत्रामध्ये सन २०१७ ला ३६ लाख ९२ हजार लोकसंख्या होती. त्यानंतर पुणे महापालिकेमध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आला, तसेच वडगाव मावळ, देहू, मंचर आणि माळेगाव येथे नगरपंचायत झाल्याने ग्रामीण क्षेत्रातून अडीच लाख लोकसंख्या कमी झाली. यामुळे पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने गटाची दोन व गणांची संख्या चारने कमी झाली आहे, तर हवेली तालुक्यातील गट संख्या तब्बल सातने कमी झाली आहे.

जिल्ह्यातील गट-गणांमध्ये असे झाले फेरबदल

तालुका - नवीन गट - नवीन गण

जुन्नर - ८ - १६आंबेगाव - ५ - १०शिरूर - ७ - १४खेड - ८ -१६मावळ - ५ - १०मुळशी - ३- ६हवेली - ६ - १२दौंड - ७ - १४पुरंदर - ४ - ८वेल्हा - २ - ४भोर - ४ - ८बारामती - ६ - १२इंदापूर - ८ - १६

एकूण - ७३ - १४६

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकारPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024