शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

Pune Visarjan 2025: पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत ७२२ गणेशभक्तांवर आपत्कालीन उपचार, ४८ जण रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:05 IST

घाम येणे, डीहायड्रेशन व चक्कर, जास्त काळ वाजणाऱ्या डीजे-ढोलताशामुळे रक्तदाब वाढणे, कानदुखी व त्रासदायक आवाजाचा परिणाम, रंगीत धूर, भस्म व धुरामुळे खोकला, दम लागणे व गुदमरणे अशांवर उपचार

पुणे: गणेश विसर्जनादरम्यान गर्दी, प्रचंड आवाज, उकाडा व तासनतास सुरू असलेल्या मिरवणुकीमुळे अनेकदा नागरिकांची तब्येत बिघडते, तर काहीजण लहान-सहान अपघातांनाही बळी पडतात. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीस व विघ्नहर्ता न्यासतर्फे यंदाही शहरात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवांचा तब्बल ७२२ गणेशभक्तांनी लाभ घेतला, तर ४८ रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शहरातील गर्दीची ठिकाणे लक्षात घेऊन वैद्यकीय सेवा केंद्रे उभारण्यात आली होती. बेलबाग चौक, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ पोलीस चौकी, लक्ष्मी रोड (गोखले हॉल), एस. पी. कॉलेज चौक, पूरम चौक, या ठिकाणी २४ तास वैद्यकीय मदत उपलब्ध होती.

विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त प्रा. डॉ. मिलिंद भोई यांच्या मार्गदर्शनासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे डॉ. शंतनू जगदाळे व डॉ. नंदकिशोर बोरसे यांनी नेतृत्व केले. त्यांच्यासोबत जवळपास १२४ डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, स्वयंसेवक, आपत्कालीन उपचार तज्ज्ञ तसेच रुग्णवाहिका चालकांचा सहभाग होता. यामुळे नागरिकांना जलद आणि तातडीची मदत मिळाली.

उष्णतेमुळे घाम येणे, डीहायड्रेशन व चक्कर येणे. जास्त काळ वाजणाऱ्या डीजे-ढोलताशामुळे रक्तदाब वाढणे, कानदुखी, चिडचिड. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना कानदुखी व त्रासदायक आवाजाचा परिणाम. रंगीत धूर, भस्म व धुरामुळे खोकला, दम लागणे व गुदमरणे. ढोल-ताशा वाजवताना लागलेली दुखापत. डीजे स्पीकर्सच्या अगदी जवळ थिरकणाऱ्यांना बहिरेपणाची लक्षणे.ट्रॅक्टरच्या चाकाखाली पाय येऊन झालेली फ्रॅक्चर्स, चेंगराचेंगरीमुळे झालेल्या दुखापती या प्रकारच्या प्रमुख तक्रारी असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यात आले. या सेवेत शेठ ताराचंद हॉस्पिटल, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, मदरहुड हॉस्पिटल, माय माऊली ॲम्ब्युलन्स, ओम ॲम्ब्युलन्स व जीवनरक्षा ॲम्ब्युलन्स आदी संस्थांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच डॉ. नितीन बोरा, डॉ. प्रीती व्हिक्टर, डॉ. कुणाल कामठे, सदाशिव कुंदेन, जयशंकर माने, डॉ. उदय झेंडे आदी डॉक्टरांचा सहभाग होता.

आपत्कालीन उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला

लक्ष्मी रोडवर मिरवणुकीत सहभागी ट्रॅक्टरचालकाला अचानक फिट्स आल्याने तो वाहन चालवताना कोसळला. तातडीने आपत्कालीन उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. महिला पोलिस कॉन्स्टेबल चक्कर येऊन पडल्या. त्यांना घटनास्थळी तातडीने मदत करून शेठ ताराचंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना धीर दिला.

पोलिस बांधवांनाही उपचार

वैद्यकीय मदत घेतलेल्या ७२२ रुग्णांपैकी तब्बल ५२ पोलीस बांधव होते. मिरवणुकीदरम्यान पोलीस दल दिवस-रात्र तैनात असल्यामुळे थकवा व उकाड्यामुळे त्यांचीही प्रकृती बिघडली होती.

टॅग्स :PuneपुणेPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सवSocialसामाजिकGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025Healthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल