शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

पुण्यातून ७ हजार परप्रांतीय आपल्या घरी रवाना; विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 21:03 IST

कामगाराची नोंदणी करण्यास ३ मेपासून शहरातील पोलीस ठाण्यात सुरुवात...

ठळक मुद्देगावी पाठविण्यासाठी विविध सेवाभावी संस्थांकडून मदत करुन मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था

पुणे : लॉकडाऊनच्या कालावधी वाढविल्यानंतर शासनाने अडकलेल्या कामगारांना परत त्यांच्या गावी पाठविण्यास मंजूरी दिल्यानंतर ९ मेपासून आतापर्यंत पुणे शहरातून तब्बल ६ हजार ९९० कामगार मुळ गावी रवाना झाले आहेत. तर पुणे शहरातील विद्यार्थी, कामगार व इतर अशा २ हजार ६२० नागरिकांना खासगी वाहनाने राज्याच्या विविध जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहेत. कामगाराची नोंदणी करण्यास ३ मेपासून शहरातील पोलीस ठाण्यात सुरुवात करण्यात आली आहे. ५ मे पासून खासगी बसने या कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यास सुरुवात झाली. ९ मेपासून पुणे रेल्वे स्टेशनवरुन रेल्वेगाड्याद्वारे कामगारांची पाठवणी सुरु झाली. लखनौला ११३१, प्रयागराज येथे १२००, हरिद्वार येथे १४४, जबलपूर येथे १४५६ नागरिकांची रवानगी करण्यात आली. जोधपूर येथे १४०० कामगार रेल्वेने गेले. अशाप्रकारे गेल्या ४ दिवसात ५ हजार ३३१ कामगार, नागरिक व त्यांची मुले पुण्यातून गावी पाठविण्यात आले आहे़त.या सर्व परप्रांतीयांची नोंदणी करणे, त्यांच्या याद्या करणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करवून घेणे़ तसेच त्यांच्याशी संपर्क साधून रेल्वेगाडीच्या अगोदर त्यांना शहरातील विविध भागातून पीएमपी बसने फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करुन पुणे रेल्वे स्टेशनला आणण्याचे काम शहर पोलीसदलाने केले़. याबरोबर शहराच्या विविध भागातून खासगी ट्रॅव्हल्स व खासगी वाहनातून आतापर्यंत १ हजार ६५९ परप्रातीयांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. या परप्रांतीयांना प्रवासाचे वेळी सुरक्षित अंतर ठेवून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटायझर, मास्क, साबण वगैरे देण्यात आले.. तसेचप्रवासात लागणाऱ्या खाण्याची व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेगाड्यांमधून जाणाऱ्या प्रवाशांना फुड पॅकेट, पाणी बॉटल, तसेच दुध, गुळ ढेप वाटप करण्यात आले. या नागरिकांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी विविध सेवाभावी संस्थांनी मदत करुन मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करुन दिली.

 पोलीस आयुक्त डॉ. के़. व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अशोक मोराळे,नोडल अधिकारी उपायुक्त सारंग आवाड, तसेच पुणे शहरातील पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त व सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्याने ही कामगिरी पार पाडली आहे.

टॅग्स :PuneपुणेLabourकामगारPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारrailwayरेल्वे