शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ग्राहकांचे ७० टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार; अजित पवारांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:20 IST

राज्यातील १ लाख ३० हजार घरांसाठी ५०० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा संच आम्ही बसवलेले आहेत

बारामती : राज्यातील ८ लाख ८ हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप आम्ही देत आहोत. यासाठी २४००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. १ लाख ३० हजार घरांसाठी ५०० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा संच आम्ही बसवलेले आहेत. येणाऱ्या काही काळात राज्यातील ग्राहकांचे ७० टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुढाळे (ता.बारामती)येथे ३३ /११ के व्ही. विद्युत उपकेंद्र भूमिपूजन पार पडले. यावेळी पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, ७० टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे. टेक्निकल लोकांनी आम्हाला सांगितले की, हे शून्यावर येणार आहे. पण मला ते ऐकून भीतीच वाटते. ते शून्यावर नाही आले म्हणजे लोक म्हणतात थापा मारतोय. पण आता शेतकऱ्यांचा आणि लोकांचा आपण फायदा करून देत आहोत असे त्यांनी सांगितले. बारामतीचा ग्रामीण आणि शहरी भाग बदलतोय. यंदाच्या वर्षी मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे काही बीज बियाणं आणि खतं लागणार आहेत, ते आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ. ज्या ठिकाणी पाणी नाही, त्याठिकाणी टँकरनं पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. आम्ही सोलर वीज उपलब्ध करून देत आहोत. या वीज उपकेंद्रामुळे मुढाळे परिसरात विजेची कमतरता भासणार नाही, हे वीज उपकेंद्राचं काम एक वर्षात पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पवार म्हणाले. लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देत असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट झाल्याचा दावा पवार यांनी केला.

मी परवा इलेक्ट्रिक ३२ लाखांची गाडी घेतली. कंपनीने ५०० किलोमीटरचा दावा केला आहे. पण साडेतीनशे किलोमीटर तर ती एकदा चार्ज केल्यावर चालते. मुंबईवरून यायचं इथं आपलं फुकट बारामतीमध्ये पोहोचायचं. महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर आम्ही आता चार्जिंग स्टेशन करत आहोत. त्याशिवाय गत्यंतर नाहीये. काळानुरूप आपल्याला बदलावी लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणelectricityवीजMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारBaramatiबारामती