शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सभासदांच्या डोक्यावर ७० कोटींचा बोजा, माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:22 IST

माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ करण्याची आवश्यकता नव्हती. तरीदेखील ही मंडळी जवळपास १५० कोटी रुपये खर्च करीत आहेत. गेल्या वार्षिक सभेत अध्यक्ष आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी स्वभांडवलातून विस्तारवाढ करणार असल्याचे खोटे सांगितले.

बारामती - माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ करण्याची आवश्यकता नव्हती. तरीदेखील ही मंडळी जवळपास १५० कोटी रुपये खर्च करीत आहेत. गेल्या वार्षिक सभेत अध्यक्ष आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी स्वभांडवलातून विस्तारवाढ करणार असल्याचे खोटे सांगितले. खोटे सांगून दिशाभुल करून आम्हा सभासदांच्या डोक्यावर सुमारे ७० कोटींचा बोजा कशासाठी ठेवला, असा सवाल माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीने केला आहे.यासंदर्भात कृती समितीच्या वतीने कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, जिल्हा बँकेचे संचालक मदनराव देवकाते, तानाजीराव कोकरे, अ‍ॅड. एस. एन. जगताप, अनिल जगताप, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, विठ्ठलराव देवकाते आदींनी पत्रकार परिषदेत बोलताना ‘माळेगाव’च्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली.माळेगाव कारखाना गेली कित्येक वर्षे कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर सभासदांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी, तसेच सभासदांना लागवडीच्या पूर्वमशागतीसाठी कांडेबिल देत आला आहे. परंतु या सत्ताधारी संचालक मंडळ ही परंपरा मोडीत काढून सभासदांच्या पैशांचा दुसºया कारणासाठी वापर करीत आहे. सत्ताधारी संचालक मंडळ हे गावोगावी फिरून आमच्याकडे पैसे शिल्लक असल्याचे सांगत आहेत, तर मग सभासदांची अडचण लक्षात घेउन कांडेबिल व दुसरा अ‍ॅडव्हान्स का देत नाही? यासाठी आम्ही सत्ताधारी संचालकांकडे वेळोवळी लेखी व तोंडी स्वरुपात मागणी केली आहे. परंतु त्याची दखलही घेतली गेली नाही.कारखान्याच्या कार्यालयातील शेतकºयांनी सभासद होण्यासाठी अर्ज दिल्यानंतर तो प्रत्येक अर्ज संचालक मंडळाच्या मासिक मिटींगमध्ये अजेंड्यावर विषय घेऊन त्यांना सभासद करून घेतले जात होते. परंतु येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी संचालक मंडळ हे नवीन सभासद करून घेत नाही. ही परंपरा सत्तारुढ संचालक मंडळाने मोडीत काढली आहे. आम्ही संचालकांनी प्रत्येक मीटिंगमध्ये वेळोवेळी आवाज उठवला. परंतु त्याची दखल घेतली जात नाही.सत्ताधारी संचालक मंडळ हे कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावी फिरून आम्ही कारखान्याची विस्तारवाढ केली असून प्रतिदिनी साडेसात ते आठ हजार टनाने गाळप करणार आहोत, असे सांगत आहेत. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांतील गळीत हंगाम पाहता सभासदांचा ऊस प्रथम गाळपाला घेण्याऐवजी गेटकेनला प्राधान्य देऊन सभासदांच्या उसाचे चिपाडे करून त्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे उद्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर सभासदांचा आडसाली ऊस संपल्यानंतरच गेटकेनला प्राधान्य द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे मदनराव देवकाते यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव, संजय देवकाते आदी उपस्थित होते.ज्येष्ठांसाठी कारखान्याची गाडी, ड्रायव्हर देण्याची काय गरज?माळेगाव कारखान्यात ज्येष्ठांना नेण्या-आणण्यासाठी गाडी, ड्रायव्हर देण्यात येतो, असा आरोप योगेश जगताप यांनी केला आहे, हे चुकीचे आहे. ज्येष्ठांसाठी कारखान्याची गाडी, ड्रायव्हर देण्याची काय गरज आहे.भ्रष्टाचार करण्यासाठी पैसे खाण्याची गरज नाही. वागण्यातूनदेखील भ्रष्टाचार होऊ शकतो, असे जगताप म्हणाले.सोमवार (दि. १३) पासून माळेगाव कारखाना शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने या पार्श्वभूमीवर सभासद संपर्क दौºयाचे आयोजन करण्यात आले आहे.हा दौरा १० दिवस २२ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. यादरम्यान माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ३० गावांमध्ये दौरा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.सत्तारूढ संचालक मंडळाच्या साखर विक्रीच्या चुकीच्या धोरणामुळे कारखान्याला तोटा सहन करण्याची वेळ आली. तो तोटा पर्यायाने सभासदांचा झाल्याचे बाळासाहेब तावरे यांनी सांगितले. शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलाचा दर्जा ढासळल्याचा मुद्दा प्रचारात सत्ताधाºयांनी केला होता. तेच विद्यमान अध्यक्ष व मार्गदर्शक यांनी तीन वर्षांत काहीही सुधारणा केलेली नसून इंग्लिश मीडियम शाळेतील तक्रारी वाढल्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेnewsबातम्या